Next
कर्मवीर जयंतीनिमित्त रथयात्रेचे आयोजन
BOI
Tuesday, September 24, 2019 | 12:40 PM
15 0 0
Share this article:


पुणे : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामार्फत भव्य रथयात्रा काढण्यात आली होते. 

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, ‘ज्ञानाची गंगा ग्रामीण भागातील घराघरात पोहोचवणाऱ्या कर्मवीर अण्णांचा विचार शहरातील घरा-घरात पोहोचावा; तसेच समाजातील लोकांनी कर्मवीरांचा विचार आत्मसात करावा. या उद्देशाने या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’


या रथयात्रेत सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत गाडगे महाराजांचा पेहराव केला होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यात यात्रेत सहभागी झाले होते. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात सात दिवस विविध उपक्रम  आयोजित करण्यात आले असून, यात वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर, रेड रिबन क्लब, रांगोळी व पुष्परचना स्पर्धा,  गीतगंधाली कार्यक्रम आणि डॉ. यशवंत पाटणे यांचे व्याख्यान आदींचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search