Next
‘सिस्का’ने दाखल केली ‘पॉवर व्हॉल्ट २०० पॉवरबँक’
१६ मार्चला फ्लिपकार्टवर दाखल केली जाणार
प्रेस रिलीज
Friday, March 15, 2019 | 05:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सिस्का अॅक्सेसरीज या मोबाइल अॅक्सेसरीजमधील आघाडीच्या आणि वायरलेस स्पीकर, वायरलेस हेडसेट, ब्ल्यू-टूथ इअरफोन, कार चार्जर्स व विविध प्रकारच्या पॉवरबँक उपलब्ध करणाऱ्या कंपनीने ‘सिस्का पॉवर व्हॉल्ट २०० पॉवरबँक’ दाखल केल्याचे जाहीर केले. ही पॉवरबँक फ्लिपकार्ट या भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स साइटवर १६ मार्च २०१९ रोजी एक हजार ९९ रुपये या सुरुवातीच्या किंमतीला उपलब्ध केली जाणार आहे.

‘सिस्का पॉवर व्हॉल्ट २००’ ही बहुपयोगी पॉवरबँक असून, ती काळ्या व पांढऱ्या रंगामध्ये मिळेल आणि त्यामध्ये मोठी ग्रेड ए प्लस २० हजार एमएचए लिथिअम पॉलिमर बॅटरी आहे. ‘सिस्का’ व ‘फ्लिपकार्ट’ यांची सक्षम भागीदारी निर्माण झाली असून, ‘सिस्का’ समूह ‘फ्लिपकार्ट’द्वारे आपल्या मोबाइल अॅक्सेसरीजची आणि पर्सनल केअर उत्पादनांची विक्री करते. या भागीदारीमुळे ‘सिस्का’ला ऑनलाइन सक्षम व्यवसाया उभारण्यासाठी मदत होणार आहे. कारण, लिथिअम पॉलिमर पॉवरबँक या अत्याधुनिक पॉवरबँक असून, त्यामुळे या श्रेणीला ऑनलाइन वाढ साधणे शक्य होणार आहे.

या निमित्त बोलताना सिस्का समूहाचे कार्यकारी संचालक गुरूमुख उत्तमचंदानी म्हणाले, ‘‘सिस्का पॉवर व्हॉल्ट २०० पॉवरबँक’ या आमच्या महत्त्वाच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी ‘फ्लिपकार्ट’शी भागीदारी करताना अतिशय आनंद होत आहे. कोणतेही नवे उत्पादन दाखल करण्यापूर्वी आम्ही ‘सिस्का’मध्ये सखोल संशोधन करतो. त्यासाठी आमच्याकडे सुसज्ज व प्रगत संशोधन व विकास प्रयोगशाळाही उपलब्ध आहे. ‘सिस्का’च्या प्रयोगशाळेतून बाहेर पडणारे प्रत्येक उत्पादन हे गुणवत्ता व विश्वासार्हता या बाबतीत कठोर चाचण्या केलेले असते. तसेच, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असल्याने व तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत असल्याने, पॉवरबँक क्षेत्र झपाट्याने वाढते आहे.’

‘फ्लिपकार्ट’मधील इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीजचे संचालक राकेश कृष्णन म्हणाले, ‘ग्राहकांच्या गरजांना अनुसरून असलेली नवी इलेक्ट्रॉनिक्स त्यांना उपलब्ध करून देणे, हे ‘फ्लिपकार्ट’मध्ये आमचे उद्दिष्ट आहे. आटोपशीर, पोर्टेबल व जलद पॉवरबँक हवी असणाऱ्या टेक-सॅव्ही ग्राहकांसाठी ‘सिस्का’ची नवी ‘पॉवर व्हॉल्ट २०० पॉवरबँक’ हे आदर्श उत्पादन आहे. ‘सिस्का’ या देशातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडबरोबर असलेली आमची भागीदारी कायम राखताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही एकत्रितपणे ग्राहकांना सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link