Next
‘लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करावा’
BOI
Saturday, May 26, 2018 | 03:24 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामकाजात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जावा,’ अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी २५ मे रोजी दिल्या.

स्मार्ट सिटी ॲडव्हायजरी फोरमची शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘स्मार्ट सिटी प्रकल्पातील विकास कामांची आखणी करताना त्याबाबत लोकप्रतिनिधींची मते जाणून घ्या. त्यांच्या मतानुसार आणि विचारविनिमय करून विकासकामे केली जावीत.  महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीच्या सल्लागार कंपन्या यांच्यात समन्वयाची आवश्यकता आहे. हा समन्वय ठेऊन कामांची गती वाढवल्यास सोलापूरच्या लौकीकात भर पडेल. स्मार्ट सिटी प्रकल्पातील उर्वरित कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जावेत. त्याच्या निविदा काढल्या जाव्यात.’

ढाकणे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत झालेल्या विविध कामांचा माहिती दिली. या वेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, चैतन्य नरोटे यांच्याबरोबरच भारत संचार निगम लिमिटेड, महावितरण आदी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
शरद सारंग पाटील , परभणी About 265 Days ago
असे सांगण्याची वेळ का आली ? छान बातमी आहे .
0
0

Select Language
Share Link