Next
इंजेक्शनच्या वेदना दूर करणारे ‘कूलसेन्स’
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this story

इंजेक्शनच्या वेदना दूर करणारे ‘ई -कूलसेन्स’ हे अनोखे उपकरण सादर करताना कूलसेन्सचे व्यवस्थापकीय भागीदार शैलेश कुलकर्णी, नितीन दिघे, डॉ. पंकज गुप्ता आदी

पुणे :   आता  इंजेक्शन घ्यायची भीती बाळगायचे कारण नाही, कारण इंजेक्शनच्या वेदना दूर करणारे ‘ई -कूलसेन्स’ हे  अनोखे  उपकरण  ‘ईश इंटरनॅशनल’ने दाखल केले आहे. 

याबाबत माहिती देताना कूलसेन्सचे व्यवस्थापकीय भागीदार शैलेश कुलकर्णी म्हणाले,  ‘ई-कूलसेन्स’ हे भारताचे पहिले स्थानिक अॅनेस्थेटिक उपकरण आहे.  ई-कूलसेन्सच्या प्रमुख युनिटमध्ये अॅल्कोहोलिक जेल असलेले निर्जंतुकीकरण तंत्र आहे. हे जेल अॅप्लीकेटरच्या त्वचेवर पसरवले जाते, ज्यामधून त्वचेला थंडावा मिळण्यासोबतच त्वचेचे संरक्षण देखील होते. इंजेक्शन देत असताना त्वचेला होणारी वेदना व त्वचेच्या जळजळीपासून किंवा दाहापासून संरक्षण करते. हे तीन ते पाच  सेकंदांमध्ये इंजेक्शनच्या वेदना कमी करते. क्रांतिकारी, अत्यंत सुलभ, उपयुक्त असे हे उपकरण क्रायो सिस्टमच्या माध्यमातून इंजेक्शन्सने होणाऱ्या वेदना कमी करते, यासाठी कोणतेच केमिकल्स लागत नाही आणि याचे कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत.’
  
‘या उपकरणामध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि काही क्षणासाठी तो भाग सुन्न करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे इंजेक्शन  देताना वेदना होत नाहीत. या उपकरणाचा पुनर्वापर करता येतो. ही प्रक्रिया ई-कूलसेन्सला थंड करण्यावर आधारित आहे.  हे उपकरण त्वचेचे तापमान बारा अंश सेल्सिअस पासून उणेदोन  अंश सेल्सिअसपर्यंत कमी करते. फ्रीजरमध्ये ठेवण्यात आलेले हे  उपकरण लगेच वापरता येते.  मूळ कंपनी कूलसेन्स लिमिटेडमध्ये वर्षानुवर्षे करण्यात आलेल्या व्यापक संशोधनातून हे उपकरण तयार करण्यात आले आहे,’ असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

‘इंजेक्शन्सची भीती वाटणे ही सामान्य बाब बनली आहे, यालाच ट्रायपॅनोफोबिआ म्हणतात. भारतातील जवळपास दहा टक्के लोकांना इंजेक्शन्सची भीती वाटते. डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेण्याच्या विचारानेही लोक घाबरतात. अनेकजण डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करून घेणे टाळतात, ज्यामुळे अशा लोकांना आजार व संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सध्या भारतात दहा  कोटी लोक मधुमेहाने पीडीत आहेत आणि यापैकी २५ टक्के रुग्णांना, विशेषतः मुलांना उपचारासाठी इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागत आहे. या भीतीवर कूलसेन्स येथील संशोधकांच्या टीमने हा अभिनव उपाय शोधून काढला आहे. ‘ई-कूलसेन्स’मुळे लोक कमी वेदना व सुलभ क्रियेचा अनुभव घेऊ शकतात’, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
 
कूलसेन्सचे व्यवस्थापकीय भागीदार नितीन दिघे म्हणाले, ‘रेफरन्स लॅब्स, हॉस्पिटल्स, रिटेल फार्मसीज,  दवाखाने, आरोग्य तपासणी,आण्विक नैदानिक चाचणी, अॅथलीटचे परीक्षण व वैद्यकीय चाचण्या अशा विविध माध्यमांमध्ये अशा प्रकाराच्या तंत्रज्ञानाची प्रबळ गरज आहे. अशा माध्यमांसाठी ई-कूलसेन्स अधिक कार्यक्षम पद्धत आणि अधिक सुधारित रुग्ण अनुभव देत आहे. तान्ही बालके, मुले, प्रौढ व वृद्ध व्यक्तींसाठी अशा प्रकारच्या पद्धती खूपच उपयुक्त आहेत. ई-कूलसेन्स हे उपकरण वेदनाविरहित इंजेक्शन प्रक्रियांसाठी विविध क्लिनिक्स, हॉस्पिटल्स व घरांमध्ये सुद्धा वापरता येऊ शकते. आम्ही आजारावरील उपचारासाठी इंजेक्शन घेणाऱ्या सर्व रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे उपकरण खासकरून इंजेक्शनची भिती वाटणाऱ्या लोकांसाठी आहे. हे उपकरण विशेषतः मुले व प्रौढ व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. चेहरा किंवा मांडीचा सांधा अशा शरीराच्या सर्वात संवेदनक्षम भागांवर इंजेक्शन घेण्याच्या प्रकियेदरम्यान वापरासाठी हे उपकरण तयार करण्यात आले आहे.’
 
 या वेळी  इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेसियोलॉजिस्ट्स (आयएसए)च्या खासगी चिकित्सक फोरमचे राष्ट्रीय सह-संयोजक आणि नाशिकमधील हंगामी चिकित्सक डॉ.पंकज गुप्ता म्हणाले, ‘अनेक मुलांना सुया आवडत नाही, काहीजणांना तर सुयांची खूपच भिती वाटते (ट्रायपॅनोफोबिआ). विविध कारणांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या जवळपास सर्व मुले व प्रौढ व्यक्तींना उपचारादरम्यान आयव्ही कॅन्युलेशन घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. हा अनुभव क्लेशकारक असू शकतो आणि यामुळे त्यांच्या मनात हॉस्पिटलबाबत वाईट आठवणी निर्माण होऊ शकतात. मुलांच्या लसीकरणादरम्यान ‘कूलसेन्स’ लस टोचणे  वेदनाविरहित करेल. डायलिसिस रुग्ण, केमोथेरेपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटोक्स इंजेक्शन्साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्माटोलॉजी, ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट/ ईएनटी सर्जन/ जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना, पॅथोलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. अॅनेस्थेसियोलॉजिस्ट म्हणून मला सांगावेसे वाटते, जीवनातील सर्व आनंदासाठी एखाद्या व्यक्तीच्या वेदना कमी करणे ही आमची मानवजातीला सर्वात मोठी भेट आहे आणि कूलसेन्स हे परिपूर्ण वैद्यकीय उपकरण आहे. मी रुग्णांच्या वेदना कमी करण्याच्या आमच्या ध्येयपूर्तीसाठी या उपकरणाचा वापर करण्याची शिफारस करतो.’ 

 (‘ई-कूलसेन्स’च्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link