Next
औरंगाबादच्या विधी विद्यापीठाला ‘वाल्मी’ची जमीन
प्रेस रिलीज
Wednesday, July 17, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this article:

औरंगाबाद : येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला जिल्ह्यातील कांचनवाडी येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) ३३ एकर जमीन विनामूल्य कब्जे हक्काने हस्तांतरित करण्यास १६ जुलैला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील युवकांना कायदेविषयक व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी बेंगलोर येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर राज्यात विधी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबादच्या पदमपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची सुरुवात वर्ष २०१७पासून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण विधी शिक्षणामुळे सामाजिक स्थैर्य, न्याय व विकासाला चालना मिळणार आहे.

राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी येथील गट क्र. १९ मधील १७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयानुसार या विद्यापीठास उच्च व तंक्ष शिक्षण विभागांतर्गत कांचनवाडी येथील गट क्र. १७ व १८ मधील ३३ एकर जमीन दिली जाणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आता एकूण ५० एकर जागा उपलब्ध झाली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search