Next
मालविका दीक्षितला ‘स्वर-एहसास’ पुरस्कार
BOI
Thursday, February 07, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील ‘एहसास’ संस्थेतर्फे आयोजित ‘ताल-तबला’ या कार्यक्रमात या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला ‘स्वर-एहसास’ हा पुरस्कार पुण्याची उदयोन्मुख गायिका मालविका दीक्षित हिला देण्यात आला आहे. ‘एहसास’तर्फे आयोजित कार्यक्रमात दर वर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

‘एहसास’ संस्थेतर्फे दर वर्षी जुन्या हिंदी चित्रपट गीतांचे चार कार्यक्रम सादर केले जातात. ही परंपरा मागील १३ वर्षांपासून सुरू आहे. या वर्षीपासून ‘प्राची धरमसी’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यातील उदयोन्मुख गायिकेला ‘स्वर-एहसास’ हा पुरस्कार देण्यात येत आहे. रविवारी (तीन फेब्रुवारी) झालेल्या ‘एहसास’ प्रस्तूत ‘ताल-तबला’ या कार्यक्रमात गायिका मालविका दीक्षितला हा पुरस्कार प्राची धरमसी यांच्या मातोश्री अपर्णा देशपांडे आणि पिताश्री वासुदेव देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

पाच हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मालविका यांनी मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय आपल्या गुरू माधुरी डोंगरे यांना दिले आहे. हा पुरस्कार आपल्याला भावी वाटचालीसाठी उर्जा देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link