Next
‘सॅमसंग’चे ‘एस९ प्लस’ आणि ‘नोट ९’ नव्या रंगात
प्रेस रिलीज
Wednesday, October 10, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this article:

गुरुग्राम : भारतातील सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँड असलेल्या ‘सॅमसंग’ने ‘गॅलेक्सी एस९ प्लस’ आणि ‘गॅलेक्सी नोट९’ हे आपले दोन प्रमुख फोन सणासुदीच्या काळासाठी गडद नव्या रंगात उपलब्ध केले आहेत. ‘एस९ प्लस’ लक्षवेधक बरगंडी रेड रंगात, तर ‘नोट ९’ अभिजात लॅव्हेंडर पर्पल रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत.

बरगंडी रंगातील ‘एस९ प्लस’ ग्राहकांना स्टाइल स्टेटमेंटबरोबरच अभिजातता पूर्णपणे नव्या पातळीला घेऊन जाणारा आहे. ‘एस९ प्लस’ बरगंडी रंगातील आवृत्ती आज उपलब्ध असलेल्या गडल लाल रंगातील एक असून, त्याचा ग्लॉस या फोन अभिनव आणि दर्जेदार फिनिशिंग देतो.

लव्हेंडर पर्पल आधुनिकता आणि सदाबहार वृत्ती दर्शवणारा दर्जेदार रंग असून, तो तरुण मिलेनियल्सना चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्की मदत करणारा आहेल. ‘नोट ९’ची राजेशाही आणि सौम्य लव्हेंडर पर्पल आवृत्ती नक्कीच इतरांचे लक्ष वेधून घेणारी आहे. हा रंग हाय फॅशनचा टच दिलेल्या स्टायलिश लूकमुळे आकर्षित करणारा आहेच, शिवाय स्मार्टफोनला अभिजात झळाळी देणारा आहे. सणासुदीचा काळ जवळ आल्याने प्रमुख फोन्सचे नवे रंग आणि त्याला दिलेली आकर्षक ऑफर्सची जोड या क्षेत्रातील ‘सॅमसंग’चे आघाडीचे स्थान बळकट करणारी आहे.

सॅमसंग इंडियाचे मोबाइल व्यवस्थापनाचे व्यवस्थापक आदित्य बब्बर म्हणाले, ‘सणासुदीच्या काळात ग्राहकांचा नवे स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करत अद्यावत राहाण्याकडे कल असतो. म्हणूनच आकर्षक नवे रंग व ऑफर्ससह उपलब्ध करण्यात आलेले आमचे प्रसिद्ध आणि प्रमुख स्मार्टफोन्स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. ही खरेदी सणांचा उत्साह द्विगुणित करेल हे नक्की.’

‘नोट ९’च्या ग्राहकांना आता २४ हजार ९९० रुपयांचे गॅलेक्सी वॉच केवळ नऊ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. ग्राहकांनी एचडीएफसी कार्ड्स किंवा पेटीएम मॉलचा वापर करून ‘एस९ प्लस’ आणि ‘नोट ९’ची खरेदी केल्यास त्यांना सहा हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल; तसेच ग्राहकांना सॅमसंग अपरग्रेड ऑफरसह नवा, अधिक सक्षम ‘नोट ९’ खरेदी केल्यास सहा हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनसही मिळू शकतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search