Next
‘व्होडाफोन’ आणि ‘नॅसकॉम’तर्फे ‘व्हाइब’ सादर
प्रेस रिलीज
Thursday, December 06, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली : व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या व्होडाफोन फाउंडेशनने नॅसकॉम फाउंडेशन आणि व्हीएसओ यांच्याशी भागीदारी करत ‘व्हाइब’ या मोबाइल अॅप्लिकेशनचे सादरीकरण केले. या वेळी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल उपस्थित होते. ‘व्हाइब’च्या मदतीने स्वयंसेवक, स्वयंसेवी मोहिमा आणि सहभाग यांसाठी प्रेरणा देणे, तसेच स्वयंसेवी प्रयत्नांचे निष्कर्ष आणि प्रभाव यांचे काटेकोर व्यवस्थापन करणे सहज शक्य होणार आहे. 

स्वयंसेवीपणाची संभाव्य क्षमता आणि परिणाम वाढवण्यासाठी ‘व्हाइब’ला विशेष पद्धतीने तयार केले असून, त्याद्वारे समाज तसेच सामाजिक हेतूला मोठ्या प्रमाणावर फायदा मिळवून देण्याचा हेतू आहे. सर्वसमावेशक वेब आधारित ऑनलाइन डॅशबोर्ड, मोबाइलद्वारे सोपी उपलब्धी यांमुळे अर्थपूर्ण संधींच्या शोधात असलेले स्वयंसेवक, स्वयंसेवीपणासाठी आपले कर्मचारी उपलब्ध करून देण्यास इच्छुक असलेले कॉर्पोरेट्स आणि विकास क्षेत्रातील संघटना-एनजीओ, ट्रस्ट्स, सामाजिक उद्योग  स्वयंसेवकांच्या सेवेच्या शोधात असलेल्यांना सांधणारा पूल खुला झाला आहे.

याप्रसंगी बोलताना गोयल म्हणाले, ‘आपल्या देशातील कित्येक जटील आव्हाने सोडवण्यात स्वयंसेवीपणाने आतापर्यंत कायमच महत्त्वाची भूमिका निभावली आहे. गुणवत्तापूर्ण स्वयंसेवकांची मोठी संख्या भारतापुढे असलेल्या प्रमुख समस्यांचा ताण हाताळण्यासाठी सज्ज आहे. मी अशाप्रकारचा संस्था, एनजीओ आणि स्वयंसेवकांना एकत्र आणणारा डिजिटल इंटरफेज तयार केल्याबद्दल आभार मानतो. यामुळे एक क्रांतीकारी उपाययोजना उदयास आली आहे.’

व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स अधिकारी प्रमुख पी. बालाजी म्हणाले, ‘व्होडाफोन आयडियामध्ये आम्ही विकास क्षेत्रातील संस्थांसाठी आणि समाजाच्या हितासाठी, तसेच सर्वसमावेशकता साध्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी बांधील आहोत. ‘कनेक्टिंग फॉर गुड’ या धोरणाअंतर्गत आम्ही यशस्वी विकास साधला आहे आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विविध कामांसाठी कार्यान्वित केल्या आहेत, ज्यामुळे समाजाला व पर्यायाने लाखोंना मोठा फायदा झाला आहे. ‘व्हाइब’ या अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठासह आम्ही वैयक्तिक आणि कॉर्पोरेट्स स्वयंसेवकांना आणि स्वयंसेवीपणाशी संबंधित यंत्रणेतील स्वयंसेवी संस्थांना जाणवत असलेली दरी सांधत आहोत. स्वयंसेवी संघटन, सहभाग आणि व्यवस्थापनासाठी हे आदर्श उत्पादन विकसित आणि उपलब्ध करण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशन व व्हीएसओ यांच्याशी भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद वाटतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link