Next
कुरूल येथे माघ वारीचा रिंगण सोहळा
BOI
Monday, January 29 | 03:23 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : कुरूल (मोहोळ) येथे नुकताच गोल रिंगण सोहळा पार पडला. माघ वारीच्या वाटेवरील या दुसऱ्या रिंगण सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी केली होती.

आषाढी-कार्तिकीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. कार्तिकीनंतर येणाऱ्या माघ वारीलाही तेवढेच महत्त्व असल्यामुळे या वारीलाही केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. आषाढी वारीत पालखी मार्गावर अनेक ठिकाणी गोल व उभा रिंगण सोहळा होतो. त्याच धर्तीवर आता माघ वारीचा सोहळा पार पडत आहे. त्यासाठी सोलापूर-तिर्हेमार्गे पंढरपूर मार्गावरही काही महाराज मंडळींनी पायी दिंड्यांची परंपरा सुरू केली आहे. यातच सोलापूर, कुरूल व सुस्ते येथे रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते.

सोलापुरातील पहिल्या उभ्या रिंगण सोहळ्यानंतर कुरूल गावी दुसरे उभे गोल रिंगण पार पडले. सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ८१ दिंड्या एकत्र येऊन सोलापुरात पहिले गोल रिंगण होते. त्यानंतर दिंड्या विभक्त होतात. यातील सुमारे २१ दिंड्यांच्या सोहळ्यात कुरूलमध्ये दुसरे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balasaheb Bhosale About 259 Days ago
छान बातमी आहे.
0
0

Select Language
Share Link