Next
‘अमृतकुंभ’ जलाशयाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, April 03, 2018 | 03:55 PM
15 0 0
Share this storyपुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यानजीक वडगाव आनंद येथील ‘अमृतकुंभ’ जलाशयाचे उद्घाटन मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते एक एप्रिल २०१८ रोजी करण्यात आले.

या जलाशयाच्या स्थापनेपूर्वी या परिसरातील तीन गावांची भिस्त टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होती. फिनोलेक्स पाइप्सने गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्येला ओळखले आणि त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. ‘अमृतकुंभ’ जलाशय भरण्यासाठी कालव्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त शिवार’मध्ये योगदानाची संधी अशा तऱ्हेने मिळाल्याबद्दल फिनोलेक्स पाईप्सला समाधान वाटत आहे.

येथे आयोजित भव्य समारंभासाठी संपूर्ण गाव मोठ्या संख्येने एकत्र आला आणि त्यांनी ‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’च्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी ‘मुकुल माधव’ने त्याच गावातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतही दिली. फिनोलेक्सचे डी. बी. वाळुंज, वैशाली देवकर, दत्ता साकोरे आणि बी आर. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या अथक परिश्रम आणि एकतेशिवाय या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता शक्य नव्हती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link