Next
‘महाराष्ट्रातील जनता हीच माझी दैवी शक्ती’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 01:37 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आपल्या देशात यात्रेचे महत्त्व मोठे आहे. महाराष्ट्राची जनता हे आपले दैवत आहे, त्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपली यात्रा आहे. ही विकास यात्रा असेल, ही विश्वास यात्रा असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्यांची एक ऑगस्टपासून राज्यव्यापी महाजनादेश यात्रा होणार आहे. त्याविषयी माहिती देताना ते बोलत होते. पंढरीच्या वारीत जसा जात, धर्म असा भेद नसतो, तशीच ही यात्रा केवळ भाजपची नाही, तर सामान्य जनतेची असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘आपल्या सर्वांच्या मेहनतीने पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री बनू शकला. ज्या कार्यकर्त्यांना काहीही मिळाले नाही आणि ज्यांनी कधी कोणती अपेक्षासुद्धा केली नाही, ते कार्यकर्ते आज खरे अभिनंदनास पात्र आहेत. हे यश त्यांचे खरे यश आहे. माझ्याकडे गमावण्यासारखेसुद्धा काहीच नाही. ना कोणता कारखाना, ना कोणती संस्था. त्यामुळे केवळ जनतेसाठी काम करणे सोपे झाले. आरक्षण, संरक्षणाचे प्रश्न सोडवू शकलो, शेतीतील अस्वस्थता कमी करू शकलो, अनेक आंदोलने झाली; पण त्यावर समर्थपणे तोडगा काढू शकलो ते केवळ यामुळेच. जे कोणत्या सरकारला जमले नाही, ते आपल्या सरकारला जमू शकले.’

‘पूर्वी दुष्काळ हा काही लोकांसाठी सुकाळ होता, पण आपण मदत करताना गैरप्रकार होऊ दिला नाही. यात्रा सुरू असताना सरकारही चालेल. पक्षाचे कितीही कार्यक्रम असोत, माझी यात्रा असेल, किंवा निवडणुकीची कामे असतील, हे करताना पहिले प्राधान्य सामान्य माणसांच्या प्रश्नांना द्या. जलयुक्त शिवारातून दुष्काळ मुक्तीकडे, भाषण नव्हे कृतीतून सामाजिक न्याय, शिक्षणात पहिल्या तीनमध्ये महाराष्ट्र, आरोग्यात सहाव्या क्रमांकावरून तिसरा क्रमांक, रोजगारात महाराष्ट्र पहिला, सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प असलेला महाराष्ट्र, शेतीसाठी सर्वाधिक तरतूद करणारा महाराष्ट्र असा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेतो आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.


‘लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने पुन्हा मैदानात उतरावे लागेल. अभिमान असावा, पण गर्व नसावा, हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक युद्ध सारखे नसते. युद्ध बदलले की शस्त्र बदलावी लागतात आणि युद्धाचे मैदान बदलले की रणनीती बदलावी लागते. ही निवडणूक युतीतच लढणार, मनात कुठलाही संभ्रम ठेवू नका. मुख्यमंत्री जनता ठरवित असते. माध्यमे संभ्रम निर्माण करतात. त्याकडे लक्ष देऊ नका. मी आधीच सांगितले आहे, मी पुन्हा येईन... मी केवळ भाजपचा नाही तर सेनेचा, रिपाईचा, रासपाचा अशा सर्व पक्षांचा मुख्यमंत्री आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. 

‘आपल्याला पराभूतांशी लढायचे आहे, तरीही सहज घेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढचे १५-२० वर्ष विरोधी पक्ष म्हणून तयार करणे ही जबाबदारी आपल्यावरच आहे. पहिले पाऊल टाकणारेच इतिहास घडवितात, हे कायम लक्षात ठेवा. चंद्रावर पाहिले पाऊल म्हणूनच नील आर्मस्ट्राँगचे पडले. प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. भाजप हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्यांचे स्वागतच असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘माझ्यासमोर बसलेला कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील जनता हेच माझे दैवत आहे आणि तीच माझी दैवी शक्ती आहे. आज महाराष्ट्र भाजपची संसद येथे जणू बसली आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व या बैठकीत आहे. विकसित भारतासाठी आपल्या आयुष्याची आहुती देणारा हा आपला कार्यकर्ता आहे. मी त्याला शत शत नमन करतो. स्व. प्रमोदजी, स्व. गोपीनाथजी आज हे यश बघायला हवे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची धूळ जरी आपण होऊ शकलो, तरी आपले ते भाग्य आहे. देश परमवैभवाकडे जातो आहे आणि त्यात खारीचा वाटा देता येतो आहे, हे माझ्या दृष्टीने कुठल्याही पदापेक्षा महत्त्वाचे आहे,’ असे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 27 Days ago
At least he is trying to meet people by going to see them , in the regions . He may be able to realise and appreciate their genuine problems . That is the first step in solving them . People will deal with him if they judge him to be sham .
0
0

Select Language
Share Link
 
Search