Next
विविध प्रश्नांबाबत आमदार कुलकर्णी यांची बैठक
प्रेस रिलीज
Monday, June 11, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this storyपुणे : कोथरूड मतदारसंघातील विविध महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव व संबधित विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कोथरूड मतदारसंघातील अनधिकृत टपऱ्या व हातगाड्यांबाबत, चांदणी चौक उड्डाणपूल, शृंगेरी मठाची जागा चांदणी चौक उड्डाणपूलामध्ये गेल्याने मिळणाऱ्या मोबदल्याबाबत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळा सुशोभिकरण व नूतनीकरण, डॉ. वैशाली जाधव यांच्या फेक पदव्या व त्यांनी केलेला पदाचा दुरुपयोग आणि डॉ. चौधरी यांच्यावर होणारी कारवाई याबाबत चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे रामबाग कॉलनी व गोपीनाथनगर, कोथरूड, महात्मा सोसायटी येथील टेकडीवरील अनधिकृत बांधकामाबाबत व अतिक्रमण, चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे जाणारा रस्त्यावर डावीकडे राजरोसपणे टेकडी फोडून बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे काम तातडीने थांबवावे व टेकडीफोड करून बांधकामाचे नकाशे मंजूर केलेले आहेत त्याचे चौकशीचे आदेश देणे, नदीपात्र रस्त्याबाबत कोर्टाने दिलेल्या अनुषंगाने प्रलंबित कामे, पिनाक सोसायटी व म्हातोबानगर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मागील डी. पी. रस्ता, कुंबरे गार्डन व पंचवटी बाणेर येथे जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस फेज एकच्या मंजूर नकाशामध्ये पार्किंग दाखवलेल्या जागेवर नवी इमारत उभारली गेली असल्याबाबत, तसेच फेज दोनचे बांधकाम थांबवण्याबाबत, ड्रेनेज लाईन तोडली असे विषय बैठकीत मांडण्यात आले.  

तसेच शांतादुर्गा सोसायटीच्या एचसीएमटीआर रोडच्या अलाइनमेंटबाबत, आयडियल कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणाला विरोध असल्याबाबत, पुर्नविकसित करण्यात येत असलेल्या झेलम सहकारी गृहरचना संस्था या संस्थेच्या सभासदांना मुदत संपूनही विकासकाकडून घराचा ताबा मिळाला नसल्याबाबत, यशश्री कॉलनी रहिवासी संघ कर्वेनगर येथील २० वर्षांपासून राहात असलेली नागरिकांची घरे नियमित करून देणेबाबत, कोथरूड येथील शिवनेरी सहकारी गृह रचना संस्थेच्या मोकळ्या भूखंडाचे गुंठेवारी अंतर्गत सन २००३ मुदतीमध्ये पुणे मनपा यांचेकडे पैसे भरून मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत व कमिटेड डेव्हलपमेंट अंतर्गत बीडीपी आरक्षण उठवून मंजुरी मिळण्याबाबत, माधवबाग सहकारी गृहरचना संस्थेच्या रस्त्यासाठी गेल्या २० वर्षांत खर्च झालेल्या निधीबाबत अशा अनेक प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस कोथरूड मतदार संघातील नगरसेवक जयंत भावे, दिलीप वेडे-पाटील, किरण दगडोजीराव पाटील, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहत्रबुद्धे, अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अनिता तलाठी, राहुल कोकाटे, बाळासाहेब टेमकर, सचिन पाषाणकर, ओमकार कदम, सचिन फोलाने, त्रिगुण रेणावीकर, बाळासाहेब धनवे, अपर्णा लोणारे, सुलभ जगताप, श्रीराम बेडकिहाळ, धारवाडकर, तसेच रामबाग कॉलनी, पिनाक सोसायटी, आयडियल कॉलनी, यशश्री कॉलनी, माधवबाग सहकारी गृहरचना संस्था, शिवनेरी सहकारी गृह रचना, शांतादुर्गा सोसायटी,  झेलम सहकारी गृहरचना संस्था, पार्क एक्सप्रेस-बालेवाडी, कुंबरे गार्डन, पंचवटी बाणेर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link