Next
प्रीती कंठके यांना मायक्रोसॉफ्टचा स्काइप मास्टर टीचर पुरस्कार जाहीर
नागेश शिंदे
Friday, October 11, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:नांदेड :
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रीती विलासराव कंठके यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून दिला जाणारा ‘स्काइप मास्टर टीचर’ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. स्काइप या अॅप्लिकेशनचा शिक्षण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण वापर करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. 

जागतिक पातळीवर ५३ देशांतून २२० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारतातील २२ शिक्षकांची निवड त्यात झाली असून, त्यात प्रीती कंठके यांचा समावेश आहे. 

यापूर्वी मुदखेड येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लागण्यासाठी आणि त्यांची इंग्रजीबद्दलची भीती घालविण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला होता. स्काइपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना २५हून अधिक देशांची सफर घडवून आणली होती. विविध देशांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुले इंग्रजी भाषेचा वापर सहज करू लागली. तसेच वेगवेगळे देश, त्यांचे वेश, भाषा, अन्न, संस्कृती यांबद्दल जाणून घेऊ लागली. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांकरिता इतर शिक्षकांचेही पाठबळ, सहकार्य त्यांना मिळाले. यामुळेच सलग दोन वर्षे त्यांना मायक्रोसॉफ्टने ‘मायक्रोसॉफ्ट इनोवेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ म्हणून सन्मानित केले आहे. 

इंजिनीअर असलेले वडील विलासराव कंठके, शिक्षिका असलेली आई जयमाला कंठके यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी वेदप्रकाश रघुनाथराव सुवर्णकार, अनिल पोतदार, जालंदर पोतदार, सुनील सुवर्णकार यांना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 1 Days ago
Best wishes for the future .
0
0
Shrikant About 3 Days ago
Very nice madam
0
0
Dhage Shital bhimrao About 5 Days ago
Excellent work 🌹🌹
0
0
Jyoti shankarrao Gangamwar About 5 Days ago
खुप सुंदर
0
0
Ambatwar Bhagyashri About 6 Days ago
Congratulations mam....Very great work.....
0
0
Pravin About 6 Days ago
Super
0
0
Jayamala suvarnkar About 6 Days ago
Very nice beta
0
0
Jayamala vilasrao kanthake About 6 Days ago
Very good mehanat, jidda ,chikati n parishrama mule yash prapt zale. Niswarth bhawnene kam kelyabaddal Abhinandan
0
0
Archana ramrao Ramangire About 7 Days ago
Very nice job pretty , hearty congratulations to you and your team of Skype
0
0
Vijay chavan About 7 Days ago
Good .... 💐
0
0

Select Language
Share Link
 
Search