Next
आठवणींतला ‘बगळा’
BOI
Wednesday, June 20, 2018 | 05:57 PM
15 0 0
Share this story

बगळानिरागस बालपणातल्या महत्त्वाच्या अशा शैक्षणिक टप्प्याला आणि सतत प्रश्न विचारण्याच्या सहज प्रवृत्तीला लेखक प्रसाद कुमठेकर यांनी आपल्या ‘बगळा’ या उदगिरी बोलीतील कादंबरीतून अधोरेखित केलं आहे. त्यांच्या या कादंबरीचा हा अल्प परिचय...
..............
प्रत्येकाच्या आयुष्यात बालपणीच्या आठवणींचा खूप मोठा खजिना असतोच असतो. मनातही तो एक वेगळा कप्पा सदैव जपलेला असतो. मग काहींच्या या आठवणी खूप धमाल असतात, तर काहींच्या कटू. या काळातील आठवणींमध्ये सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा टप्पा असतो तो  शाळेचा. या निरागस बालपणातल्या प्रवृत्तीतील अनेक कंगोरे या पुस्तकातून उलगडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. 

क्रिकेट खेळताना चेंडू हरवल्यावर त्याची नुकसानभरपाई देण्यासाठी अर्धा वेळ शाळा बुडवायची. ते बगळे मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडी, हे या कादंबरीचं आशयसूत्र आहे. हे विश्व रंगवताना ही कादंबरी यातील मुख्य पात्राबरोबरच इतर महत्त्वाच्या काही पात्रांवरही प्रकाश टाकते. मुख्य पात्र रचताना त्याच्यासोबत इतर पात्रही सूचकतेनं रचते. 

घरची परिस्थिती, कुटुंबातील ताणतणाव, संसाराचं रहाटगाडगं चालवताना घरातल्या लोकांची होणारी कुतरओढ हे सगळं पाहत मोठं होताना बालमनावर ओढला गेलेला ओरखडा आणि मग या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी आपल्या कुवतीनुसार केलेली धडपड याचं वास्तवदर्शी चित्र डोळ्यांसमोर उभी करणारं हे पुस्तक आहे. 

शिक्षणव्यवस्थेतील विसंगती अधोरेखित करताना व्यवस्थेवर कुठेही थेट आरोप-प्रत्यारोप न करण्याचं तंत्र लेखकाने पाळल्याचं दिसतं. शालेय पातळीवर मुलांसाठी पोषक असे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. शिवाय ते केवळ शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्यापुरतेच सीमित न राहता त्यादृष्टीने पालक आणि समाजातील इतर घटकांनाही त्यात सहभागी करून करून घेतले पाहिजे, असे थेट अपील या कादंबरीतून लेखकाने केले असल्याचे दिसते. संपूर्ण कादंबरी उदगिरी बोलीत असल्यामुळे त्याचा एक वेगळा बाज तयार झाला आहे. त्यामुळे कादंबरी आणखी वाचनीय होते; मात्र ही बोली ज्यांच्या परिचयाची नाही, त्यांना अर्थातच समजण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु प्रादेशिक बोलीचे दस्तऐवजीकरण हा महत्त्वाचा हेतू यातून साध्य झाला आहे, एवढं मात्र नक्की.

पुस्तक : बगळा 
लेखक : प्रसाद कुमठेकर
प्रकाशक : पार पब्लिकेशन्स, ६-ब, सूर्यकिरण बिल्डिंग, पांडुरंग साळुंके मार्ग, डहाणूकर वाडी, कांदिवली (प.), मुंबई – ६७ 
संपर्क : ७७३८६ १६०५९
पृष्ठे : १५८
मूल्य : ३०० ₹

(‘बगळा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pralhad Sudhkar Kokabe About 236 Days ago
प्रत्यकाने वाचावी अशी कादंबरी आहे ....!!!!!
1
0

Select Language
Share Link