Next
एम. एस. सथ्यू
BOI
Friday, July 06 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘गरम हवा’ या सिनेमाने समीक्षकांची वाहवा मिळवलेले दिग्दर्शक एम. एस. सथ्यू यांचा सहा जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...... 
सहा जुलै १९३० रोजी म्हैसूरमध्ये जन्मलेले एम. एस. सथ्यू हे सिनेदिग्दर्शक, कलादिग्दर्शक, पटकथाकार आणि कॅमेरामन म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘हकीकत’ या चेतन आनंद यांच्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या सिनेमाच्या कलादिग्दर्शनाबद्दल त्यांना १९६४ सालचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘गरम हवा’ या चित्रपटाची समीक्षकांनी वाहवा केली होती. आणि त्या सिनेमाला नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला होता. तसंच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन पाम नामांकनसुद्धा त्या सिनेमाला मिळालं होतं. त्यांना १९७५ साली पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं होतं. कन्नेश्वर राम, सुखा, कोट्टा, बारा, कहां कहांसे गुजर गये, असे त्यांचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.

यांचाही आज जन्मदिन :
व्यंकटेश माडगूळकर, रेखा बैजल आणि वि. म. दांडेकर (त्यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
व्यंकटेश माडगूळकर यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.
रेखा बैजल यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link