Next
रोपळे बुद्रुक येथे बालदिन उत्साहात
BOI
Tuesday, November 14 | 06:22 PM
15 0 0
Share this story

चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेली मुले.रोपळे (पंढरपूर) : येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १४ नोव्हेंबर हा दिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी हवेत फुगे सोडून बालदिनाचा आनंद लुटला.

येथील तबेला चौकातील अंगणवाडीत बालदिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या वेळी जमलेल्या चिमुकल्यांनी गुलाबी थंडीत चित्रे रंगवण्याचा आनंद लुटला. दरम्यान, माता पालक उषा काळे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अंगणवाडी सेविका उर्मिला देशपांडे व मदतनीस मंगल झगडे यांनी चिमुकल्यांना विविधरंगी फुगे व खाऊचे वाटप केले.

रोपळे बुद्रूक (पंढरपूर) : येथे हवेत फुगे सोडून बालदिनाचा मनस्वी आनंद लुटणाऱ्या चिमुकल्याचे टिपलेले छायाचित्र.  (छायाचित्रे : मोहन काळे, रोपळे बुद्रुक)जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिद्धेश्वर भोसले यांनी विद्यार्थांना खाऊचे वाटप केले. या दरम्यान, विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहशिक्षकांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link