Next
काव्यत्रयी
BOI
Friday, July 13 | 10:25 AM
15 0 0
Share this story

कवयित्री वैष्णवी यांच्या तीन कवितासंग्रहांचा हा संच आहे. संवेदनशील मनाने टिपलेला आसपास, मनात उमटलेले विचारतरंग आणि तटस्थपणे केलेले चिंतन त्यांनी या कवितासंग्रहांतील कवितांमधून शब्दबद्ध केले आहे. ‘प्रिय तुझ्यासाठी’ या संग्रहातील कविता अर्थातच प्रेमी जीवांच्या व्यथा-वेदना, काळजी प्रेमभावाचे चित्रण करणाऱ्या आहेत. ‘तुझ्या श्वासातलं माझं अस्तित्व तू सहजपणे नाकारलंस तरी’, अशी भावना व्यक्त करते.

‘टपटपणं’मधील कवितांमधून निसर्ग, माणूस यांचे नाते जसे सांगते, तशीच माणसामाणसातील नात्यांचाही चिंतनशील वेध घेते. ‘नसतातच किनारे काही नात्यांना’, असे म्हणतानाच ‘असतोच रे अंत समुद्रालाही, कुठंतरी’ असा विचारही मनात उमटलेला असतो. ‘असंही... तसंही...’मधील मुक्तछंदातील कविता ‘माझ्या श्वासातच फिरे, तुझ्या श्वासातच फिरे, तुझ्या स्वसाचा वावर...’असे सांगणारी आहे.

प्रकाशक : लाटकर प्रकाशन
पाने : ५००
किंमत : ४५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link