Next
‘महाबँके’तर्फे राज्यभरात शेतकरी मेळावे
प्रेस रिलीज
Tuesday, July 31, 2018 | 04:32 PM
15 0 0
Share this article:पुणे : महाराष्ट्र राज्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे २८ जुलै रोजी राज्यामधील बँकेच्या ७४१ ग्रामीण, अर्धशहरी शाखांमार्फत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ‘बँक आपल्या दारी’ या योजनेची संकल्पना अंमलात आणून शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत बँकेच्या कृषी योजनांची माहिती या मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकार्‍यानी शेतकर्‍यांना दिली.

बँकेच्या देशभरात एक हजार ८४६ शाखांचे जाळे असून, त्यातील एक हजार १३२ शाखा महाराष्ट्र राज्यामधे आहेत. यातील ७६६ ग्रामीण, अर्धशहरी शाखा शेतकर्‍यांना कृषीविषयक योजनांच्या माध्यमातून वित्तीय सेवा देत आहेत.

या मेळाव्यात बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर आंचल कार्यालयातील अधिकारी त्याचबरोबर शाखाप्रमुख आणि कृषी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन महाबँक किसान क्रेडिट कार्ड यांसह बँकेच्या इतर कृषी विषयक योजनांची माहिती दिली. या वेळी शेतकर्‍यांच्या नव्या पीककर्ज मंजुरीसह छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत असलेल्या लाभार्थीवर नव्याने कर्ज वाटप करण्यास विशेष भर देण्यात आला; तसेच सध्याच्या पीककर्जधारक शेतकर्‍यांना त्यांच्या महाबँक किसान क्रेडिट कार्डाचे तात्काळ नूतनीकरण करून सवलतीच्या योजनेच्या कर्ज व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.      

मेळाव्यातील शेतकर्‍यांना बँकेच्या अधिकार्‍यानी कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, यासारख्या किरकोळ (रिटेल) कर्जाबरोबरच मुद्रा कर्ज, तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांमधील प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजनांविषयी मेळाव्यामधे चर्चा करून माहिती देण्यात आली.

सहभागी शेतकर्‍यांना कृषी कर्ज योजनाविषयी मराठीमध्ये छापलेली माहितीपत्रके वितरित केली. मेळाव्यामध्येच काही निवडक शेतकर्‍यांना ताबडतोब कर्ज मंजूरी पत्र दिली गेली. कर्जासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची यादी आणि कृषी कर्ज अर्जदेखील या वेळी वितरित करण्यात आले.

राज्यातील सर्व भागातील शेतकर्‍यांकडून बँकेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये ५० हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी सहभाग घेतला ज्यात जवळपास २० हजार कर्ज अर्ज प्राप्त झाले. अभियानावेळी पीककर्जासाठी दहा हजार शेतकर्‍यांना त्याचवेळी ८५ कोटींची सैद्धांतिक मंजूरी पत्रे दिली गेली. बँकेद्वारा सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत शेतकर्‍यांनी गौरवोद्गार काढून वास्तवामधे बँक ऑफ महाराष्ट्र ‘शेतकर्‍यांची जिव्हाळ्याची बँक’ असल्याचे महाबँकेने सिद्ध केल्याची प्रतिक्रिया दिली.

‘राज्याची एसएलबीसी संयोजक असलेल्या महाबँकेनी तात्काळ घेतलेले निर्णय आणि ग्राहकांना वेळेवर केलेल्या मदतीच्या आश्वासनाबरोबर संपूर्ण कृषी समुदायाच्या कल्याणासाठी केलेला हा एक नवा प्रयत्न आहे. यापुढेही भविष्यात बँकेमार्फत असेच उपक्रम चालू रहातील,’ असे बँकेमार्फत सांगण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search