Next
वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदत्तक योजना
BOI
Tuesday, May 16, 2017 | 02:25 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोभालीवली (पालघर): महाराष्ट्र शासनाच्या दोन कोटी वृक्षलागवडीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ‘विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर’ संचालित ‘पर्यावरण विवेक समिती’द्वारे भालीवली येथे एफडीसीएमकडून एक हजार वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला गेला. 

त्यातील ५०० झाडे परवानगी घेऊन संस्थेच्या परिसरात (महामार्ग क्र. आठवर, खानीवडे टोलनाक्यापासून एक किलोमीटर आधी) वनविभागाच्या जमिनीवर लावण्यात आली व ५०० झाडे ‘विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर राष्ट्र सेवा समिती’च्या शाळेतील विद्यार्थांच्या घरी लावण्यात आली आहेत. 

‘पर्यावरण विवेक समिती’द्वारे या वृक्षांच्या संवर्धनाच्या व जनजागृती करण्याच्या उद्देशाने वृक्षदत्तक योजना राबवली जाते. वृक्ष दत्तक घेणाऱ्यांची नावे रोपांवर टॅग करण्याबरोबरच वेबसाइट्सवरही तीन वर्षांसाठी दिसतात. संस्थेतर्फे दत्तक वृक्षांचा सांभाळ करण्यासाठी एक विशेष व्यक्ती मासिक पगारावर नेमण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दर दोन-तीन महिन्यांतून गरजेप्रमाणे बाहेरून कामगार मागवून वृक्षांची काळजी घेतली जाते. 

प्रातिनिधिक फोटोपर्यावरण समितीद्वारे दर १५ दिवसांनी वृक्षांचे ऑडीट केले जाते व वृक्ष दत्तक घेणाऱ्या पालकाला त्या वृक्षांची वर्तमान स्थिती व्हॉटस अॅपद्वारे व ईमेलद्वारे कळविण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांमधून वृक्षांची उत्तम वाढ होण्यासाठी प्रयत्नशील विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात येते. 

पर्यावरण समितीमध्ये अनुभवी निवृत्त वनविभाग अधिकाऱ्यांचा व पर्यावरणप्रेमींचा समावेश आहे. 

पर्यावरण समिती प्रमुख : उमेश गुप्ता
संपर्क : ९३२२६ ९२७४३, ९४२२४ ९२७४३
अधिक माहितीसाठी : 
www.vivektreeplantation.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search