Next
राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन
प्रेस रिलीज
Monday, February 12 | 06:10 PM
15 0 0
Share this story

पुणे :  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर आणि इंद्रायणी हँडलूम्स यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत  आरटीओजवळील एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय हातमाग वस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे व्यवसथापकीय संचालक संजय मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी भारत सरकारच्या केंद्रीय हातमाग मंत्रालयातील उपसंचालक आर. एम. परमार, व्यवस्थापकीय सहसंचालक विजय निमजे, इंद्रायणी हँडलूम्सची ब्रँड अॅीम्बेसडर व मिसेस युनिव्हर्स (लव्हली) शिल्पा अगरवाल आणि डिझायनर निधी गांधी उपस्थित होते.


हातमाग व्यावसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हातमाग प्रदर्शन आयोजित केले जात आहे. राज्य शासनाच्या सहकार्यातून यंदा हे प्रदर्शन पाच वर्षानंतर पुण्यात होत आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, जम्मु अँड काश्मीर, मध्यप्रदेश, हरियाना, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली आदी तेरा राज्यांतील ७३ संस्था सहभागी झाल्या आहेत. जवळपास पंचेचाळीसहजार चौरस फूट आकाराचे दालन यासाठी उभारले गेले आहे. 

(या प्रदर्शनाविषयी माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link