Next
‘डिजिटल स्टोरी टेलिंग’ ​कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, May 19 | 11:09 AM
15 0 0
Share this story



पुणे : अमेरिकन कॉन्स्युलेट आणि युनायटेड स्टेट एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी आयोजित ही एक दिवसीय कार्यशाळा १७ मे रोजी हॉटेल प्राईड येथे पार पडली.
कार्यशाळेमध्ये पुणे, सांगली, औरंगाबाद मधील शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे ३५ प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अवंता फाउंडेशन, येरळा वाणी, अलोचना, जल बिरादरी, आस्था फाउंडेशन, मशाल, फ्युएल, ‘एमकेसीएल’ या संस्थांचा समावेश होता.

बहुमाध्यम (मल्टी मीडिया) तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण दामले यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. दामले यांनी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये एमएस (अमेरिका) केले आहे. ते फुलब्राइट स्कॉलर असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील एज्युकेशनल मल्टिमिडीया रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत.

कार्यशाळेची सुरुवात मुंबईच्या अमेरिकन कॉन्स्युलेटचे सहाय्यक सांस्कृतिक कार्य अधिकारी जोनाथन हवांग यांनी केली. युनायटेड स्टेट एज्युकेशनल फाउंडेशन इंडियाच्या कार्यक्रम व्यवस्थापक सुरंजना दास यांनी स्वागत केले. दामले यांनी ‘डिजिटल स्टोरी टेलिंग टुल्स अ‍ॅंड टेक्निक्स’ याविषयी मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link