Next
‘एसबीआय’ आणि ‘हिताची’ यांची भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, March 07, 2019 | 11:49 AM
15 0 0
Share this storyमुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या हिताची लिमिटेडच्या उपकंपनीने भारत व इतर देशांसाठी अत्याधुनिक डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म प्रस्थापित करण्यासाठी मुंबईत व्यापारी संपादन संयुक्त भागीदारी ‘एसबीआय पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (एसबीआयपीएसपीएल) जाहीर केली.

ही संयुक्त भागीदारी भारतातील डिजिटल पेमेंट्स सेवांचा विस्तार करणार असून, त्यासाठी अत्याधुनिक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मची निर्मिती करणार आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांच्या गरजा पुरवणारी नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करणे शक्य होणार आहे. ब्रँडचे मूल्य आणि ‘एसबीआय’चे वितरण नेटवर्क विस्तारेल, तसेच ‘हिताची’च्या कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर तंत्रज्ञानविषयक क्षमता ‘एसबीआयपीएसपीएल’ला मिळतील.

‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, ‘या संयुक्त भागीदारीद्वारे आम्ही व्यापारी डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील आघाडीच्या संपादकाचे स्थान राखण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना अधिक चांगली व विनाअडथळा तंत्रज्ञान सेवा पुरवली जाणार आहे. त्याशिवाय आम्ही आतापर्यंत न प्रवेश केलेल्या भारतीय गावांत आणि शहरांत व्यापारी केंद्रित डिजिटल पेमेंट सेवांद्वारे विस्तार करण्यासाठी व्यवसाय विश्लेषणाचा वापर करणार आहोत.’

मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात अधिकृत सादर करताना हिज एक्सलन्सी, जपानचे भारतातील अम्बेसिडर केंजी हिरामत्सू, ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार, हिताची लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तोशियाकी हिगाशिहारा, ‘एसबीआय’चे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) पी. के. गुप्ता यांसह ग्राहक, भागीदार व ‘एसबीआय’ तसेच ‘हिताची’चे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जपानचे भारतातील अम्बेसिडर हिज एक्सलन्सी, केंजी हिरामत्सू म्हणाले, ‘जपान व भारतामध्ये अतिशय दृढ नाते असून, हे सहकार्य आणखी विस्तारण्याची गरज आहे. मला खात्री आहे, की भारतातील सर्वात मोठी बँक आणि जपानमधील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी या भागिदारीद्वारे देशातील डिजिटल पेमेंट्स सेवा नव्या उंचीवर नेईल.’

‘हिताची’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिगाशिहारा, म्हणाले, ‘‘एसबीआय’बरोबरच्या ‘हिताची’च्या संयुक्त भागीदारीमुळे भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या विकासाला अत्याधुनिक डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात चांगले योगदान मिळेल आणि ‘एसबीआय’च्या दमदार ग्राहक नेटवर्कचाही लाभ होईल. शिवाय हे भारत व इतर देशांतील लोकांना डिजिटल सेवा पुरवून त्यांचे आयुष्य उंचावण्याच्या ‘हिताची’च्या धोरणाशी सुसंगत आहे.’

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक असलेल्या ‘एसबीआय’कडे ४२५ दशलक्ष ग्राहक, सहा लाख पीओएस टर्मिनल्स, १६ लाखांपेक्षा जास्त व्यापारी पेमेंट्स स्वीकृती टच पॉइंट्स असून, बँकेने ८० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार पर्यायी वितरण चॅनेल्सकडे वळवली आहेत. ही संयुक्त भागीदारी हा उपक्रम आणखी पुढे नेण्याची अपेक्षा आहे.

‘हिताची पेमेंट सर्व्हिसेस’द्वारे आर्थिक संस्थांना सर्वसमावेशक तंत्रज्ञानविषयक रोख आणि डिजिटल पेमेंट्स सेवा (एटीएम सेवा, कॅश रिसायकलिंग मशीन्स, पीओएस प्रक्रिया सेवा, टोल आणि ट्रान्झिट) सेवा दिल्या जातात. कंपनीद्वारे २०११पासून ‘एसबीआय’च्या कार्ड व डिजिटल स्वीकृती पेमेंट नेटवर्कसाठी अंमलबजावणी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन सेवा पुरवल्या जात आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link