Next
‘पर्यावरणाची हानी न करता सण साजरे करावेत’
प्रेस रिलीज
Tuesday, March 19, 2019 | 02:51 PM
15 0 0
Share this article:

सध्या सर्वत्र होळीची धामधूम आहे. रंगाची उधळण करणाऱ्या होळी सणालाही विशेष महत्त्व असल्याने प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. मालिकेत काम करणारे कलाकारही याला अपवाद नाहीत. ‘स्टार प्रवाह’वरील वेगवेगळ्या मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेले हे कलाकार हा सण कसा साजरा करतात याबद्दलच्या आठवणी सांगत त्यांनी प्रेक्षकांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
......................................................................

भार्गवी चिरमुलेभार्गवी चिरमुले सांगतात, ‘माझी नवी मालिका ‘मोलकरीण बाई’ २५ मार्च २०१९पासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार आहे. त्यामुळे उत्सुकता आहेच. मालिकेत आम्ही धुळवडीचा खास सिक्वेन्स शूट केलाय. यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी मी रंग खेळले. खूप मजा आली. हा धमाकेदार सीन लवकरच मालिकेत पाहायला मिळेल. आनंद हा शोधण्यात असतो त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मुक्या प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत सण साजरे व्हायला हवेत असे मला वाटते.’
 
आशुतोष कुलकर्णीआशुतोष कुलकर्णी म्हणाले, ‘मी मुळचा पुण्याचा. होलिका दहनानंतर पाचव्या दिवशी येणारी रंगपंचमी आम्ही साजरी करायचो. कॉलेजच्या मित्रांसोबत तेव्हा रंग, पिचकारी आणून मी दणक्यात हा सण साजरा केलाय. आता तसे सेलिब्रेशन करणे जमत नाही. मालिकेच्या निमित्ताने दरवर्षी सेटवरच रंगपंचमी साजरी होते; पण होळीची पूजा मात्र मी दरवर्षी न चुकता करतो. सणाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गोडाधोडाचा आस्वादही घेतो.’

गौरव घाटणेकरहोळीच्या आठवणी सांगताना गौरव घाटणेकर म्हणाले, ‘होळी आणि धुळवडीच्या माझ्या खूपच खास आठवणी आहेत. शाळेत असताना अगदी शाई फेकण्यापासून या सेलिब्रेशनला सुरुवात व्हायची. आईच्या हातच्या गरम गरम पुरणपोळीवर ताव मारत मी हा सण साजरा करायचो. आता पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकडे माझा कल असतो. यंदा ‘ललित २०५’ च्या सेटवर मी धुळवडीची सगळी हौस भागवून घेतलीय. सलग तीन दिवस आम्ही सीनच्या निमित्ताने सेटवर होळी साजरी केली. ही खास आठवण मी कधीच विसरू शकत नाही.’
 
अमृता पवारअमृता पवार यांनी सांगितले की, ‘मी मूळची कोकणातली. त्यामुळे दर वर्षी कोकणातल्या शिमगोत्सवाला आवर्जून जायचे. यंदा शूटिंगमुळे जाणे होणार नाही; पण गावात साजरा केला जाणारा हा सण खूपच स्पेशल आहे. पारंपरिक पद्धतीने बांधली जाणारी होळी, त्यानिमित्ताने नातेवाईकांच्या होणाऱ्या भेटीगाठी आणि खास म्हणजे कोकणात घरोघरी येणारी देवाची पालखी हा माहोल भारावून टाकणारा असतो. यंदा ‘ललित २०५’च्या कुटुंबासोबत सेटवरची धुळवड मी एन्जॉय केली आहे.’
 
अश्विनी कासारअश्विनी कासार म्हणाल्या, ‘मी मूळची बदलापूरची. एकत्र कुटुंबात वाढलेली. त्यामुळे आम्ही सगळे मिळून अंगणात होळी बांधायचो आणि आजही ही प्रथा अखंड सुरू आहे. माझी आजी होळीसाठी द्राक्षापासून दागिने बनवायची. आम्हा मुलांसाठीही बत्ताश्याचे दागिने तयार करायची. त्या दागिन्यांची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे. धुळवडही आम्ही एकत्र खेळायचो. यादिवशी किचनचा संपूर्ण ताबा घरातल्या पुरुष मंडळींकडे असतो. गरम गरम भजी आणि वड्यांचा बेत धुळवडीच्या निमित्ताने दरवर्षी आखला जातो. यंदा ‘मोलकरीण बाई’च्या सेटवर आम्ही धुळवड खेळलो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search