Next
‘लॉरिए’तर्फे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रेस रिलीज
Friday, July 13, 2018 | 02:22 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘द वर्ल्ड नीड्स सायन्स अॅंड सायन्स नीड्स विमेन’ या घोषवाक्यासह लॉरिए इंडियाने भारतातील बारावी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींकडून ‘फॉर यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप प्रोग्राम’च्या (एफवायडब्ल्यूआयएस) १६व्या आवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. लॉरिए इंडिया हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील ५० विद्यार्थिनींना मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठांतून विज्ञान शाखेची पदवी संपादन करण्यासाठी प्रत्येकी २.५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहे.

याबाबत ‘लॉरिए’च्या संवाद, शाश्वतता आणि जनव्यवहार विभागाच्या प्रमुख स्नेहल चितनेनी म्हणाल्या, ‘विज्ञान हाच प्रगतीचा स्रोत आहे आणि त्यात स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे यावर ‘लॉरिए’चा ठाम विश्वास आहे. ‘फॉर यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप’ या आमच्या उपक्रमाचे लक्ष्य विज्ञानात शिक्षण किंवा करिअर करू इच्छिणाऱ्या, पण त्यासाठी पुरेसे पाठबळ नसलेल्या तरुणींना मदत व प्रोत्साहन देणे हेच आहे. या उपक्रमाचे हे १६वे वर्ष असून, भविष्यातही अनेक पात्र उमेदवारांपर्यंत पोहोचता येईल अशी आशा आम्हाला वाटते.’

हा कार्यक्रम सुरू केल्यापासून म्हणजेच २००३पासून ‘लॉरिए’ने भारतातील मुलींना ३०० शिष्यवृत्ती दिल्या आहेत. तरुण प्रतिभावान मुलींना त्यांची स्वप्ने व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत लक्षणीय प्रगती साधण्यास हा उपक्रम मदत करत आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय ‘लॉरिए-युनेस्को’ यांच्या ‘विमेन इन सायन्स’ कार्यक्रमाचाच विस्तारित भाग आहे. गेल्या वर्षी या शिष्यवृत्तीसाठी देशभरातून तीन हजारांहून अधिक अर्ज आले. तपशीलवार मूल्यांकन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्वांत पात्र अशा ५० उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

भारतातील मार्च २०१८मध्ये संपलेल्या शैक्षणिक वर्षांत बारावीची परीक्षा पीसीएम, पीसीबी ग्रुपमधून किमान ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व ३१ मे २०१८ रोजी ज्यांचे वय १९ वर्षे किंवा त्याहून कमी आहे अशा तरुण मुली या शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवण्यात पात्र आहेत. ही शिष्यवृत्तीवै द्यकीय, इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, फार्मसी, जैवतंत्रज्ञान आणि विज्ञान शाखेतील अन्य पदवी अभ्यासक्रमाचे (बीएससी) शिक्षण घेण्यासाठी ही वापरता येईल. आवश्यक कागदपत्रांसह तरुणी १६ जुलै २०१८ पर्यंत अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : http://www.foryoungwomeninscience.com/
पत्ता : लॉरिए इंडिया स्कॉलरशिप सेल, केअर ऑफ बडीफॉरस्टडी, स्टेलर आयटी पार्क सी-२५, क्रमांक ८, ९ आणि दहा, टॉवर-१. तळमजला, सेक्टर-६२, नॉएडा, उत्तर प्रदेश, भारत, २०१३०१.  या पत्त्यावर कुरिअरद्वारे पाठवू शकतात. .
मुलाखतीची ठिकाणे : मुंबई, गुरगाव, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता.
अधिक माहितीसाठी संपर्क : (०२२) ६७०० ३०००
वेबसाइट : fywis.india@loreal.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link