Next
आत्ता कोणते शेअर घ्याल?
BOI
Sunday, June 03 | 03:45 PM
15 0 0
Share this story

मार्च २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीत गुंतवणूकही जास्त झाली आहे. यंदा पावसाळा उत्तम होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शेअर बाजारातील कोणते शेअर सध्या घेण्याजोगे आहेत, याबद्दल पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.....
गेल्या शुक्रवारी (एक जून रोजी) मार्च २०१८च्या तिमाहीच्या अर्थव्यवस्थेचे आकडे जाहीर झाले. या तिमाहीत अर्थव्यवस्थेची ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सात तिमाहींमधील ही उच्चांकी वाढ आहे. बांधकाम क्षेत्रातील वाढ ११.५ टक्के आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढही ९.१ टक्के अशी सात तिमाहींमधील अशी उच्चांकी आहे. खासगी खर्च (कंझम्पशन) या क्षेत्रातील वाढ ६.७ टक्के आहे. या तिमाहीत गुंतवणूक जास्तीत जास्त झाली. ही वाढ सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३२.२ टक्के आहे. जिथे रोजगार जास्त लावला जातो, असे बांधकाम क्षेत्र मंदीच्या विळख्यातून बाहेर येत आहे. कृषी क्षेत्रातील उच्चांकी वाढ (४.५ टक्के ही अर्थव्यवस्था सुधारण्याचे निदर्शक आहे. यंदाचा पावसाळा उत्तम होणार असल्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांना सुखदायक ठरेल. गाभा क्षेत्रातील आठही क्षेत्रांत एप्रिल २०१८मध्ये ४.७ टक्के वाढ झाली आहे. कोळसा, नैसर्गिक वायू आणि सिमेंट या तीन क्षेत्रांत ४.४ टक्के वाढ दिसते. एप्रिल २०१७मध्ये गाभा क्षेत्रातील वाढ फक्त २.६ टक्के होती. 

‘रेन इंडस्ट्रीज’चा शेअर नुकताच २२२ रुपयांपर्यंत उतरला होता. या भावाला तो जरूर घेण्यासारखा आहे. सध्या त्यात सुमारे २० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर फक्त आठपट आहे. दिलीप बिल्डकॉन हा शेअरही ८५० रुपयांपर्यंत वर चढत आहे. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांक १२४८ रुपये इतका होता, तर किमान भाव फक्त ४०५ रुपये  होता. ‘दिवाण हाउसिंग’ हा शेअरही सध्या ६१० रुपयांना जरूर घ्यावा.

‘सेबी’ने शुक्रवारी अनेक शेअर्स देखरेखीसाठी (Surveillance) घेतले. ग्राफाइट इंडिया, रेन इंडस्ट्रीज यांचे भाव त्यामुळे खाली आले आहेत. ग्राफाइट इंडिया शेअर ८५० रुपयांना व रेन इंडस्ट्रीज शेअर २१५ रुपयांपर्यंत घ्यावा. हेग, दिवाण हाउसिंग फायनान्स, रेप्को होम या कंपन्यांचे शेअरही नेहमीच्या घेण्याच्या यादीतील आहेत; मात्र ‘झट मंगनी, पट शादी’ अशा स्वरूपाचा नफा अपेक्षू नये. नफ्यासाठी दिवाळीपर्यंत थांबायची तयारी हवी.

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link