Next
मराठी पत्रकार परिषदेचे ४२वे राष्ट्रीय अधिवेशन नांदेडला
BOI
Tuesday, May 28, 2019 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचे ४२वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा २७ व २८ जुलै २०१९ रोजी नांदेड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी मुंबई येथे केली. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनाला देशभरातून दोन हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांसाठी वैचारिक मेजवाणी असते. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात मान्यवरांची विविध विषयांवरची भाषणे, परिसंवाद, मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम घेतले जातात. या वर्षीचे द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे घेण्यात येणार आहे. या आधी १९९८मध्ये परिषदेचे अधिवेशन नांदेडला झाले होते. त्यानंतर आता तब्बल २१ वर्षांनी पुन्हा नांदेडला अधिवेशन होत आहे. 

रस्त, रेल्वे आणि विमानमार्गे नांदेड देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेले असल्याने येथे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने लवकरच नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर यांनी दिली.

या अधिवेशनास देशभरातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्थ देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, कार्याध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, कोषाध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव विजयकुमार जोशी, प्रमोद माने, उपाध्यक्ष विजय दगडू, शिवराज काटकर, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, परिषद कार्यकारिणी सदस्य रामभाऊ शेवडीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search