Next
‘स्टुडिओ मार्स’ला इनोव्हेशन पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, June 07 | 04:45 PM
15 0 0
Share this story

‘इनोव्हेशन’ पुरस्कार स्वीकारताना स्टुडिओ मार्सच्या सहसंस्थापिका शोभना हडप, प्रमुख कार्यकारी अधिकारी मंगेश लोहपात्रे आणि इतर सदस्य अलंकार नाईक, जुई अरूणा अन्वर आणि सिद्धी मुसळे

पुणे : येथील स्टुडिओ मार्स या डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचा नुकत्याच मुंबईत झालेल्या पाचव्या क्युरिअस क्रिएटिव्ह  पुरस्कार सोहळ्यात ‘इनोव्हेशन’ (InOOHvation) पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कायनेटिकच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन’ या जाहिरात निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कायनेटिक अॅडव्हर्टायझिंग इंडिया प्रा. लि. चे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुरेश बालकृष्ण यांच्या हस्ते स्टुडिओ मार्सच्या सहसंस्थापिका व क्रिएटिव्ह  डायरेक्टर शोभना हडप, प्रमुख कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक मंगेश लोहपात्रे आणि त्यांच्या चमूतील इतर सदस्य अलंकार नाईक, जुई अरुणा अन्वर आणि सिद्धी मुसळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.                    

येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य लक्षात घेत त्यांनाही स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यावरण मिळावे यासाठी होंडाने सुरू केलेल्या उपक्रमासंबंधी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्टुडिओ मार्सने ‘विल दे सी ब्लू’ नावाच्या ‘आऊट ऑफ होम कॅम्पेन’चे सादरीकरण केले. त्यासाठी त्यांना इनोव्हेशन पुरस्काराने गौरविण्यात आले.

या वेळी बोलताना शोभना हडप म्हणाल्या, ‘क्युरिअस क्रिएटिव्ह  पुरस्कारांमध्ये आमच्या संस्थेचा झालेला गौरव ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब असून, आमच्या कल्पनांना मिळालेली ही दाद आहे. या सन्मानाने पुणे शहराचे नावही आता मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांच्या बरोबरीने घेतले जाईल याचा आम्हाला अभिमान आहे.’        

स्टुडिओ मार्स ही पुण्यातील नावाजलेली डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था असून, भारतातील पहिल्या दहा क्रिएटिव्ह  डिझाईन फर्ममध्ये तिची गणना केली जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link