Next
‘क्विक हील फाउंडेशन’तर्फे ‘साय-फाय करंडक’ स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, October 28, 2017 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

साय-फाय करंडक स्पर्धेच्या बोधचिन्हाचे उदघाटन करताना क्विक हील टेक्नॉलॉजीज् लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर,  सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त मिलींद पाटील व एक्स्प्रेशन लॅबचे संचालक प्रदीप वैद्य 
पुणे : सायबर सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आयटी सुरक्षा सोल्युशन्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या क्विक हील टेक्नॉलॉजीज् लिमिटेड कंपनीच्या ‘क्विक हील फाउंडेशन’ या संस्थेने पुणे शहर पोलिसांशी भागीदारी करून ‘साय-फाय करंडक २०१७’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन केले आहे. मानवी आयुष्यावर डिजिटल क्रांतीचा झालेला परिणाम व्यापकपणे मांडणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन एक अंकी नाटकांचे हे आधुनिक व्यासपीठ आहे. 

साय-फाय करंडक स्पर्धेच्या बोधचिन्हाचे उदघाटन क्विक हील टेक्नॉलॉजीज् लिमिटेड कंपनीचे वरीष्ठ कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर, पुणे पोलिसांच्या वित्तीय गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त मिलींद पाटील आणि एक्स्प्रेशन लॅबचे संचालक प्रदीप वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना दर्जेदार संहिता तयार करता यावी, म्हणून सायबर गुन्ह्याच्या क्षेत्रातल्या खऱ्याखुऱ्या घटनांची माहिती देऊन पुणे शहर पोलिस दलाची सायबर गुन्हे शाखा यात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. नेटीझन्ससाठी डिजिटलायझेशनचे आभासी जग अधिक सुरक्षित करण्याप्रति क्विक हील आणि पुणे पोलिस कटीबद्ध असल्याचे साय-फाय करंडक हे प्रतिक आहे.
 
या वेळी  क्विक हील टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे वरीष्ठ कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर म्हणाले, ‘सामाजिक विकास, शिक्षण आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांत कल्पक उपक्रमांची आखणी करून अधिक सुसह्य आणि चांगले जग निर्माण करण्याप्रति क्विक हील फाउंडेशन कटीबद्ध आहे. २०१४ मध्ये  स्थापना झाल्यापासून, सायबर सुरक्षा या विषयावर क्विक हील फाऊंडेशनने जवळजवळ आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे. सायबर सुरक्षा सोल्यूशन्सच्या क्षेत्रातील अग्रेसर कंपनी या नात्याने, नेटीझन्सना डिजिटल जगताची काळी बाजू वेळोवेळी दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. या प्रयत्नांतूनच साय-फाय करंडकासारखे उपक्रम आकाराला येतात. या आगळ्यावेगळ्या एक अंकी नाट्यमहोत्सवातून लोकांना डिजिटल जगतातील धोके आणि समस्या समजतीलच. त्याचबरोबर नाट्यकर्मींनाही त्यांची कला सादर करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे शहर पोलिस आणि एक्स्प्रेस लॅबसारखे आमचे भागीदार यांचे मी आभार मानतो’.

पुणे शहर पोलिस दलाच्या ईओडब्ल्यू आणि सायबर सुरक्षा विभागाचे पोलिस उपायुक्त मिलिंद पाटील म्हणाले, ‘डिजिटायझेशनच्या वाढीमुळे सायबर गुन्ह्यांचे धोकेही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. २०१७ मध्ये  साली पुणे शहरात चार हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली तर, २०१६मध्ये हा आकडा दोन हजार ७९  इतका होता. यातून एक लक्षात येते, की हा धोका दररोज वाढत चालला आहे आणि म्हणूनच, सायबर गुन्ह्यांबाबत योग्य माहिती देऊन त्याविषयी नेटीझन्सना जागरुक करण्याची आवश्यकताही वाढीस लागली आहे. ही बाब ध्यानात घेऊन, साय-फाय करंडक सारख्या आधुनिक कलेच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी क्विक हील फाउंडेशनशी आम्ही भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होतो आहे.
 
एक्स्प्रेशन लॅबचे संचालक प्रदीप वैद्य म्हणाले, ‘नाट्यसृष्टी हे आपण जगत असलेल्या काळाचे प्रतिबिंब असते. या युगात आपण सर्वचजण या ना त्या रुपात इंटरनेटशी जोडले गेले आहोत. त्यामुळे, प्रत्येक वेळी जागरुक राहणे आणि सुरक्षेची खात्री करून घेणे अत्यंत कष्टाचे जाते. साय-फाय करंडक  हे डिजिटल विश्वाचे प्रतिबिंब ठरणार आहे. आधुनिक नाट्यकलेच्या माध्यमातून लोकांना जागरुक करण्यासाठी क्विक हील फाउंडेशन आणि पुणे पोलिसांसह आम्ही केलेली भागीदारी ही फार महत्वाची आहे’.
 
 ‘सायबर जगतातले मानवी आयुष्य - सोयीस्कर कितपत आणि धोकादायक कितपत?’ या थीमवर आधारित नाटके नाट्य-चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध कलाकारांसमोर सादर करण्याची संधी या निवडक संघांना मिळणार आहे. या ऑफलाईन महोत्सवाव्यतिरिक्त, साय-फाय ऑनलाईन करंडक स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राबाहेरील नाट्य कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यासाठीही करण्यात आले आहे. उत्सुक स्पर्धक सोशल मिडियावर आपली नाटके अपलोड करू शकतात व त्याची लिंक info@cyfiarts.comया ई-मेल आयडीवर पाठवू शकतात. ज्या स्पर्धकाला जास्त लाईक्स मिळतील, तो या स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तज्ज्ञ परिक्षकांकडून देण्यात येणार आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, गोवा आणि नागपूर या शहरांत  सहा  केंद्रांच्या माध्यमातून सप्टेंबरपासूनच साय-फाय करंडकसाठीच्या अर्जस्विकृतीला सुरुवात झाली आहे. शंभरहून अधिक संघांनी यात  सहभाग घेतला होता. दोन महिने चाललेल्या अटीतटीच्या निवड प्रक्रियेनंतर, २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत पुण्यातल्या भरत नाट्य मंदीर येथे रंगणाऱ्या अंतिम फेरीसाठी २८ संघांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती  या वेळी देण्यात आली.
अधिक माहिती www.cyfiarts.com या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search