Next
‘समाजामध्ये सगळेच अट्टल गुन्हेगार नसतात’
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this story

रंगत संगत कविसंमेलनप्रसंगी डावीकडून प्रभा सोनवणे, प्रमोद आडकर, डॉ. विठ्ठलराव जाधव, विद्या जाधव, मैथिली आडकर आणि शिल्पा देशपांडे.

पुणे : ‘समाजामध्ये चांगल्या लोकांची संख्या जास्त असून, समाजात सगळेच गुन्हेगार नसतात. त्यामुळे माणसाच्या चांगुलपणावर पोलीस खात्याचाही विश्वास आहे,’ असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी केले.

रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे कविसंमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमोद आडकर, प्रभा सोनवणे, विद्या जाधव, मैथिली आडकर आणि शिल्पा देशपांडे उपस्थित होत्या. पोलिसांना रुक्ष समजले जाते, पण कवितेच्या माध्यमातून त्यांच्याविषयीची भावना व्यक्त होत आहे याचे समाधान वाटत असल्याचे जाधव म्हणाले.
 
काव्यवाचनामध्ये डॉ. जाधव यांच्या पत्नी विद्या यांनीही कविता सादर केली आणि पोलीस कुटुंबाविषयी आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर जयंत भिडे, वसंत गोखले, सुधीर कुबेर, रूपाली अवचार, प्रमोद खराडे, स्वाती यादव आदींनी कविता सादर केली. प्रभा सोनवणे यांची जातीय वादावरील कविता, सुजित कदम यांची ढासळत्या कुटुंब व्यवस्थेची कविता रसिकांना भावविवश करून गेली, तर वंदना लोखंडे यांनी ‘पोलीसदादा तुम्हा सलाम’ या कवितेतून पोलिसांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. वैशाली मोहिते यांच्या ‘बाजीराव म्हणत्यात मला’ या मिश्किल पण राजकीय भाष्य करणाऱ्या कवितेने रसिकांची मने जिंकली.

चंचल काळे, चिन्मयी चिटणीस यांच्या कवितांमधून समाज व्यथा मांडण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त धोपावतकर यांनी पोलीस आणि गृहिणी यांच्यामधील साम्य दाखवणारी कविता सादर केली आणि गृहिणीसारखेच आमचे काम नि:स्वार्थ अपेक्षविरहित असते, हे स्पष्ट केले. उद्धव कानडे यांच्या मानवतावादी कवितेने संमेलनाचा समारोप झाला. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link