Next
‘लायन्स क्लब’तर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Monday, May 06, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत डावीकडून आनंद आंबेकर, मेघना शिंदे, संगीता झंवर व अनिता नेवे.

पुणे : ‘महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात दुष्काळाचे भीषण संकट ओढावले आहे. यंदाच्या या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीतर्फे १० मे २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील जोत्स्ना भोळे सभागृहात मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन (ओरिएन्टेशन) आनंद आंबेकर, लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या मेघना शिंदे, संगीता झंवर व अनिता नेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या विषयी अधिक माहिती देताना शिंदे म्हणाल्या, ‘लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या सभासदांनी पुण्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. भूजल विभागाच्या वरिष्ठ भूगर्भ तज्ज्ञांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. सतीश उमरीकर अणि डॉ. भाग्यश्री मक्तेवार हे मार्गदर्शन करणार आहे. या वेळी उद्घाटक म्हणून प्रांतपाल रमेश शहा, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून आपण आपल्या मृत अवस्थेतील बोअरवेल जिवंत करू शकतो, तसेच टँकरमुक्त सोसायटी करू शकतो. नागरिक व सहकारी गृहरचना संस्थांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.’

आंबेकर म्हणाले, ‘यंदा ऑगस्टमध्ये धरणे भरल्याने आपण खुश झालो; पण परतीच्या पावसाने अचानक पळ काढल्याने आपल्या तोंडचेही पाणी पळाले. यंदा आणखी एका दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. कारण आपण भूगर्भातून पाण्याचा उपसा करतो; मात्र, भूगर्भात पाणी कोणी भरत नाही. जलसंवर्धन अत्यल्प प्रमाणात होते. बोअरिंग करताना प्रत्येकाने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून भूगर्भात पाणी सोडले पाहिजे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे व्हावे आणि त्यासाठी जनजागृती व्हायला हवी.’

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शुक्रवार, १० मे २०१९
वेळ : सायंकाळी पाच वाजता 
स्थळ : जोत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रस्ता, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 75 Days ago
More people should hear of the scheme and the practicalities . Vikas Sangam , in Pune , may be interested in giving publicity .
0
0

Select Language
Share Link
 
Search