Next
सूत्रसंचालनाचे अंतरंग
BOI
Tuesday, June 05, 2018 | 01:59 PM
15 0 0
Share this article:

ज्यांना सूत्रसंचालन व वक्तृत्वाची कला विकसित करायची आहे,त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक म्हणजे ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग.’ सूत्रसंचालक आणि वक्ते यांना उपयोगी ठरू शकतील, अशी अनेक उद्धृते, ओव्या आणि अशा बऱ्याच गोष्टी प्रा. दिगंबर मारुती ढोकले यांनी या पुस्तकात संकलित केल्या आहेत. काषाय प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाचा हा परिचय...
............
ज्यांना सूत्रसंचालन व वक्तृत्वाची कला विकसित करायची आहे, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक म्हणजे ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग.’ या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या, संत तुकारामांच्या निवडक अभंगांच्या ओळी, संस्कृत सुभाषिते (अर्थासह), हिंदी शायरी व इंग्रजीमधील दर्जेदार अवतरणे आहेत. तसेच आई, मराठी भाषा, वडील, शिक्षक, तरुण, महिला, देशभक्ती, राजकारण, विवाह, पालक इत्यादी विविध विषयांवर मराठीतील दर्जेदार वाक्ये, विचार यांचे संकलन आहे. बोधकथा, शाळांमध्ये साजरे होणारे दिनविशेष, विविध राष्ट्रपुरुषांची थोडक्यात माहिती, श्री दत्तगुरूंचे २४ गुरू अशा माहितीचाही पुस्तकात अंतर्भाव केलेला आहे. सूत्रसंचालन करताना स्वागत, दीपप्रज्वलन, वृक्षपूजन, आभारप्रदर्शन आदींसाठी लागणाऱ्या साहित्यसामग्रीबद्दलची माहितीही यात देण्यात आली आहे.

प्रा. दिगंबर ढोकले यांनी विविध व्याख्यानांत ऐकलेली, विविध पुस्तकांत वाचलेली चांगली वाक्ये, विचार यांचा समावेश आपल्या या पुस्तकात केला आहे. ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्यांच्या मतानुसार, हे पुस्तक कीर्तनकार, प्रवचनकार यांनाही उपयुक्त आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांनी तर या पुस्तकाला सूत्रसंचालकाची शिदोरी असे म्हटले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे महाव्यवस्थापक विवेक सावंत म्हणतात, ‘सूपभर लाह्यांत दडलेला एकच बत्तासा हुडकून काढून तो इतरांना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वारकऱ्याच्या मुलाप्रमाणे प्रा. ढोलके यांचे हे संकलन आहे.’ 

लायन्स क्लबचे प्रांतपाल ला. गिरीश मालपाणी, सुप्रसिद्ध वक्ते राज मुछाल, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे यांचे शुभेच्छा संदेश या पुस्तकाला लाभले आहेत. विविध सार्वजनिक कार्यक्रम, तसेच व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या विविध प्रसंगांसाठी अनुरूप अशा साहित्याचा आणि वक्तृत्वासाठीच्या विचारधनाचा खजिना या पुस्तकाद्वारे वाचकांसाठी खुला झाला आहे.

पुस्तक : सूत्रसंचालनाचे अंतरंग
संकलक : प्रा. दिगंबर मारुती ढोकले
प्रकाशन : काषाय प्रकाशन
पृष्ठे : १९२
मूल्य : २०० रुपये

(‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search