Next
‘खिळेमुक्त झाड अभियान’तर्फे निवेदन
प्रेस रिलीज
Monday, September 10 | 12:43 PM
15 0 0
Share this story

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देताना अनंत घरत, मनीष जगदाळे, किशोर राजपूत आदीपुणे : शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात खिळेमुक्त झाड अभियानमार्फत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

माय अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अनंत घरत, सिंहगड युवा फाउंडेशनचे मनीष जगदाळे, वृक्षप्राधिकरण माजी सदस्य किशोर राजपूत, शिवसेना विभागप्रमुख सुरज लोखंडे, युवराज पारीख, तानाजी लोहकरे, अनिकेत देशमुख, राजेश शेलार आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

‘व्यावसायिक आणि जाहिरातदार झाडांना खिळे, जाहिरात फलक ठोकून हानी पोहोचवतात आणि शहर विद्रुप करतात, त्यांच्यावर कारवाई करावी; तसेच झाडांना खिळे ठोकू नये असा कायदेशीर अधिनियम करावा,’ अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link