Next
क्रेआ विद्यापीठाची घोषणा
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 03:30 PM
15 0 0
Share this storyपुणे : एकविसाव्या शतकातील नवी आव्हाने आणि संधी पाहाता भविष्यातील नेत्यांना त्यानुसार बदलावे लागेल, अर्थपूर्ण उद्देश ठेवावा लागेल आणि नैतिक मार्गाने प्रभाव तयार करण्यासाठी सामाजिक परिणाम समजून घ्यावे लागतील. हे साध्य करण्यासाठी नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट लीडर्स क्रेआ विद्यापीठाची घोषणा करण्यासाठी एकत्र आले आहेत.

क्रेआ विद्यापीठाने ‘इंटरवोवन लर्निंग’ हा अनोखा दृष्टीकोन तयार केला आहे. ज्यामध्ये सर्जनशीलता आणि कृती, कला आणि विज्ञान, तात्विकता आणि व्यवहार्यता, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारसरणी  तसेच भूतकाळाने दिलेली शिकवण आणि भविष्याची तयारी यांचा मिलाफ साधण्यात आला आहे. या मान्यवर प्रशासकीय आणि शिक्षणतज्ज्ञ मंडळासह विद्यापीठ उच्च शैक्षणिक आणि नीतीपूर्ण मापदंड प्रस्थापित करेल.

विद्यापीठाने लिबरल आर्ट्स अँड सायन्समध्ये चार वर्षांचा निवासी पदवीपूर्व अभ्यासक्रम तयार केला असून त्याद्वारे बीए (ऑनर्स) आणि बीएस्सी (ऑनर्स) पदवी दिली जाईल. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना बंधनकारक, बहुआयामी मूलभूतता आणि कौशल्य अभ्यासक्रमांचा पाया रचल्यानंतर आवडीनुसार वैकल्पिक निवड करता येईल. वास्तविक जगाशी संबंधित प्रकल्पांतून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना आव्हाने आणि संधींना सामोरे जाण्याचा समग्र अनुभव देईल.

बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक असलेले, उच्च क्षमता बाळगणारे विद्यार्थी आकर्षित करण्याचा विद्यापीठाचा हेतू असून त्यासाठी कडक, बहुविध निकषांवर आधारित प्रक्रिया राबवली जाईल. पारदर्शक आणि केवळ गुणवत्तेवर आधारित असलेली ही प्रवेश प्रक्रिया गुणी विद्यार्थ्यांचे आर्थिक क्षमतेअभावी नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेईल. विद्यापीठाद्वारे चेन्नईजवळी स्री सिटीमध्ये २०० एकरांवर जागतिक दर्जाचा, शिक्षणस्नेही, सुरक्षित आणि स्मार्ट निवासी कँपस बांधला जाणार आहे.

घोषणा कार्यक्रमादरम्यान क्रेआ प्रशासकीय कौन्सिलचे सल्लागार डॉ. रधुराम राजन म्हणाले, ‘आम्ही येथे विचारशील भारतीयांची नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, जे जगाच्या विकासासाठी योगदान देतील. आज भारतात जे अस्तित्वातच नाही, मात्र ज्याची देशाला अतिशय गरज आहे ते विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा हेतू आहे.’

क्रेआ प्रशासकीय कौन्सिलचे सदस्य सज्जन जिंदाल, म्हणाले, ‘क्रेआचा एक भाग होताना जागतिक दर्जाची संस्था स्थापन करण्यासाठी महान जागतिक आणि भारतीय मने एकत्र आणताना मला अतिशय आनंद होत आहे.’

या नव्या संस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना ‘क्रेआ’चे सदस्य आनंद महिंद्रा म्हणाले, ‘क्रेआचे पदवीधर निःसंशयपणे कॉर्पोरेट तसेच इतर क्षेत्रांत उच्च क्षमतेचे उमेदवार ठरतील.’

‘समान विचारसरणी असलेल्या नामवंत व्यक्ती उत्साहाने एकत्र आलेल्या आहेत ही बाबच या नव्या प्रकारच्या संस्थेची किती गरज आहे हे याचा पुरावा देणारी आहे,’ असे क्रेआ विद्यापीठाचे अध्यक्ष एन. वाघुल म्हणाले.

विद्यापीठाच्या सुपरव्हायजिंग बोर्डाचे अध्यक्ष श्री. सेषशायी यांनी ‘इंटरवोवन लर्निंग’ हा अनोखा दृष्टीकोन समाजवून सांगितला. या वेळी उपकुलगुरू डॉ. सुंदर रामास्वामी, ‘क्रेआ’च्या सदस्य मंजुल भार्गव यांनी मनोगत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link