Next
‘एसकेएफ’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी भटनागर
प्रेस रिलीज
Tuesday, August 07, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने त्यांच्या झालेल्या बैठकीत मनीष भटनागर यांची व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) पदावर नियुक्ती केली. ही नियुक्ती १६ ऑगस्ट २०१८पासून लागू ठरणार असून, पुढील पाच वर्षांसाठी आहे. मंडळाने कार्ल ओरस्टॅडिअस यांचा व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामाही त्याच तारखेपासून स्वीकारला आहे.

या वेळी एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या मंडळाचे अध्यक्ष राकेश माखिजा म्हणाले, ‘मनीष यांचे एसकेएफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर स्वागत करताना मला आनंद होत आहे. डॅनहर कॉर्पोरेशन, अंडररायटर्स लॅबोरेटरीज इंक आणि जनरल इलेक्ट्रिकसारख्या कंपन्यांमधील त्यांचा समृद्ध अनुभव एसकेएफसाठी लाभदायक ठरेल. त्यांना यश लाभेल अशा शुभेच्छा मी देतो.’

‘त्याचवेळी मी या स्थित्यंतराच्या काळात कार्ल ओरस्टॅडिअस यांचेही एसकेएफ इंडियामध्ये दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल आभार मानतो. येथील छोट्या कार्यकाळातही कार्ल यांनी उत्तम कामगिरी बजावली आणि एसकेएफ समूहाच्या वतीने मी त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो,’ असे माखिजा यांनी नमूद केले.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link