Next
‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या चौथ्या पर्वाची घोषणा
BOI
Monday, December 24, 2018 | 05:57 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : श्रमदानातून जलसंवर्धनाची अनोखी चळवळ असलेल्या पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’चे चौथे पर्व लवकरच सुरू होणार आहे. स्पर्धेचा कालावधी आठ एप्रिल ते २२ मे २०१९ पर्यंत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. या स्पर्धेत यंदा पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना एकूण सव्वा नऊ कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील.

‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे सहभागी झाले होते. 

‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने जलयुक्त शिवार अभियानातील श्रमदान चळवळीत भर टाकली आहे. पहिल्या तीन सत्रांप्रमाणेच या चौथ्या स्पर्धेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. राज्य सरकार संपूर्ण यंत्रणेसह या उपक्रमासोबत आहे’, असे फडणवीस यांनी सांगितले.

‘दर वर्षीप्रमाणेच पानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज आणि उत्सुक आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पुन्हा एकदा विकेंद्रीत जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व समजले आहे. या वर्षी निवडलेल्या ७६ तालुक्यांमधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा’, असे आमीर खान यांनी सांगितले.

पहिल्या तीन विजेत्या गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search