Next
‘मिसेस वेस्ट इंडिया’ची महाअंतिम फेरी जल्लोषात
प्रेस रिलीज
Friday, April 26, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘मिसेस वेस्ट इंडिया– एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ सीझन टू’ या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच हयात पुणे या हॉटेलमध्ये उत्साही आणि जल्लोषात झाली. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष असून, या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यांतून ३२ स्पर्धक निवडण्यात आल्या होत्या. 

स्पर्धकांना तज्ज्ञांकडून पाच दिवस स्पर्धेच्या विविध पैलूंबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात परिचय, व्हॉइस मॉड्युलेशन, स्टेज प्रेझेन्स, प्रश्नोत्तरे, रॅम्प वॉक यांचा समावेश होता. दिवा पेजंट्सचे तज्ज्ञ मार्गदर्शक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांनी या पैलूंमध्ये अधिक सुधारणा घडवून स्पर्धकांना घडवले. परीक्षक मंडळात महेक चहल (अभिनेत्री), नयनी दिक्षीत (अभिनेत्री), शिबानी कश्यप (गायिका), राज कौशल (दिग्दर्शक), सुमीत कुमार (हयात पुणेचे सरव्यवस्थापक), विवेक मेंडोंसा (लॉरेन्स अँड मेयो), मोना बोरसे (क्वीन ऑफ दी वर्ल्ड २०१९), नम्रता दुबे (मिसेस वेस्ट इंडिया २०१८) या नामवंतांचा समावेश होता.

प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेता अमन यतन वर्मा याने महाअंतिम फेरीचे सूत्रसंचालन केले. शिबानी कश्यप हिने गाणी सादर केली आणि दिवा स्पर्धेच्या माजी स्पर्धकांनी त्याला नृत्याची जोड दिली. उपांत्य फेरीतील १६ स्पर्धकांतून सिल्व्हर (वय २० ते ३६) आणि गोल्ड (वय ३७ व पुढे) या दोन श्रेणींमध्ये केवळ सहा सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करणे परीक्षकांनाही कठीण गेले. 

स्पर्धेचा निकाल असा : शीर्षक विजेते- मिसेस वेस्ट इंडिया– एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ (सिल्व्हर)- वार्तिका पाटील, मिसेस वेस्ट इंडिया– एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ (गोल्ड)- हेतल कास्लीवाल. फर्स्ट रनर अप (सिल्व्हर)- सिंथीया फुर्टाडो, फर्स्ट रनर अप (गोल्ड)- मंजू कटारिया. सेकंड रनर अप (सिल्व्हर)– स्वाती गुंडावार, सेकंड रनर अप (गोल्ड)– इरफाना शेख. पश्चिम भारतातून निवडण्यात आलेल्या चार विभागीय क्वीन्सही अशा : क्वीन ऑफ मुंबई– प्राची म्हात्रे, क्वीन ऑफ नाशिक– कुंदा शिंदे, क्वीन ऑफ नागपूर– प्रीती देशमुख आणि क्वीन ऑफ पुणे– मंजू नानकानी.


विजेत्यांना मोदसूत्र, लॉरेन्स अँड मेयो, दी टॅरट लेडी, स्किनवर्क्स व रॉयल ऑर्गेनिक यांच्याकडून मुकूट, रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search