Next
कविवर्य शेवरे साहित्य संमेलन २६ रोजी जामसंडेला
BOI
Wednesday, November 15 | 06:01 PM
15 0 0
Share this story

कविवर्य आ. सो. शेवरेदेवगड (सिंधुदुर्ग) : तळकोकणात पहिली विद्रोही साहित्य चळवळ सुरू करणारे ज्येष्ठ विद्रोही कवी आ. सो. शेवरे तथा आबा यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने आ. सो. शेवरे स्मृती संयोजन समितीतर्फे २६ नोव्हेंबरला आ. सो. शेवरे स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.

हे संमेलन जामसंडे येथील नलावडे सभागृहात होईल. दलित साहित्याचे अभ्यासक विनायक मिठबांवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कवी अजय कांडर, भगवान निळे, वीरधवल परब, विजय जाधव आदी मान्यवर निमंत्रित आहेत.

‘शेवरे यांनी आयुष्य कवितेसाठी वाहिले होते. १९९० साली ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनात कवी शेवरे यांना कविवर्य बा. सी. मर्ढेकर काव्य पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांचे ‘गंधारीची फुले’ ‘दफनवेणा’ हे दोन कवितासंग्रह गाजले. त्यांच्यामुळेच तळकोकणात परिवर्तन साहित्याची चळवळ रुजली. आजच्या कोकणात विद्रोही कवी-लेखकांच्या लेखनामागे शेवरे यांच्याच साहित्य चळवळीची प्रेरणा आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे,’ अशी माहिती संमेलनाचे संयोजक डी. के. पडेलकर, प्रकाश जाधव, प्रदीप नाईक यांनी दिली.

उद्घाटनानंतर ‘आ. सो. शेवरे यांची कविता’ या विषयावर पहिले सत्र होणार असून विनायक मिठबांकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कविवर्य काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सत्रात प्रा. सीमा हडकर, विजय जाधव, मधुसूदन नानिवडेकर, डॉ. आशिष नाईक, प्रदीप नाईक हे शेवरे यांच्या कवितेच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करतील.

दुपारी कवी भगवान निळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्य जागर’ हे चर्चासत्र होणार आहे. यात कादंबरीकार–कवी प्रवीण बांदेकर, विचारवंत डॉ. श्रीधर पवार, कवी वीरधवल परब, अजय कांडर, डॉ. अनिल कांबळी हे ‘कवितेमागील आपली भूमिका’ या विषयावर मांडणी करून आपाआपल्या कवितांचे वाचन करतील.

त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. यात डॉ. नामदेव गवळी, अरूण नाईक, सुनील हेतकर, मधुकर मातोंडकर, सुरेश कुराडे, मोहन कुंभार, सफरअली इसफ, विठ्ठल कदम, मनीषा जाधव, अंकुश कदम, बाळा कदम, महेश काणेकर, डॉ. स्मिता गायकवाड, डॉ. ऋषिकेश गायकवाड, सुनंदा कांबळे, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, भरत नाईक, सतीश कदम, सुनील घस्ती, उदय सर्पे, दीपक तळवडेकर, सचिन जाधव, नारायण कांबळे, वि. अ. सावंत, पुरुषोत्तम कदम, नीता कामत, रश्मी साटम, सरिता पवार, चंद्रशेखर तेली, मिलिंद जामसंडेकर, विद्यानंद शिरगांवकर, मोहन जाधव आदींना कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

कोकणातील दलित साहित्यात विशेष योगदान देणाऱ्या नामवंत कथाकार सिद्धार्थ देवधेकर, विशाखा पुरस्कार प्राप्त कवी अरूण नाईक त्याचबरोबर नवोदित कवयित्री अनुजा पवार यांचा संमेलनात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link