Next
गोंदकरने पटकावला ‘आयटी आयडॉल’ किताब
प्रेस रिलीज
Thursday, April 12, 2018 | 03:23 PM
15 0 0
Share this story

​‘सीड महा आयटी आयडॉल २०१८’ या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांबरोबर (डावीकडून) सीड इन्फोटेकचे प्रमुख कार्यकारी अधिकारी नरेंद्र बऱ्हाटे, सागर अजागे (द्वितीय क्रमांक), यश गोंदकर (प्रथम क्रमांक), हर्ष क्षत्रिय (तृतीय क्रमांक), संस्थे

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील सी प्रोग्रॅमिंग व माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी राज्यभर घेतल्या जाणाऱ्या ‘सीड आयटी आयडॉल’ या स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच पुण्यात झाली. या स्पर्धेत मुंबईच्या थडोमल सहानी इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या यश गोंदकर याने प्रथम क्रमांक मिळवत ‘सीड महा आयटी आयडॉल’चा किताब पटकावला आहे.  

माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील प्रशिक्षण सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सीड इन्फोटेक या संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अहमदनगरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा सागर अजागे याने द्वितीय, तर मुंबईच्या अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या हर्ष क्षत्रिय याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

स्पर्धेच्या प्रथम क्रमांक विजेत्यास एसर लॅपटॉप, द्वितीय क्रमांक विजेत्यास मोटो सी प्लस स्मार्टफोन, तर तृतीय क्रमांक विजेत्यास वेस्टर्न डिजिटल २ टीबी एक्स्टर्नल हार्ड डिस्क देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सीड इन्फोटेक व ट्रिसेंटिस यांच्याकडून डिस्काउंट व्हाऊचर्स, गुडी बॅग, सन्मानचिन्हे व सन्मानपदके प्रदान करून विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.     

संस्थेतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरावर सीड आयटी आयडॉल ही स्पर्धा घेतली जाते. अभियांत्रिकी व इतर शाखांचे विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची जाणीव करून देणे व त्याचबरोबर भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना तयार करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख हेतू आहे. विविध विद्यापीठांच्या मान्यतेने हा उपक्रम राबवला जातो.

या वर्षी राज्यभरातून २७३ महाविद्यालये या उपक्रमात सहभागी झाली होती व त्याद्वारे ५० हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या प्रथम फेरीत भाग घेतला. त्यातील १० हजार विद्यार्थ्यांची द्वितीय फेरीसाठी निवड करण्यात आली होती. नुकत्याच आयोजित केलेल्या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत राज्याच्या प्रत्येक विभागातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांना पुण्यात बोलाविण्यात आले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link