Next
‘जग्वार आय-पेस’ला ‘२०१९ वर्ल्ड कार अॅवॉर्ड’
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 02:59 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ऑल-इलेक्ट्रिक ‘जग्वार आय-पेस’ने ‘२०१९ वर्ल्ड कार अॅवॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या गाडीने मानाचे ‘२०१९ वर्ल्ड कार ऑफ दी इअर’ आणि ‘वर्ल्ड कार डिझाइन ऑफ दी इअर’ हे पुरस्कार पटकावलेच. शिवाय, या गाडीला वर्ल्ड ग्रीन कार हा किताबही देण्यात आला. या पुरस्कारांच्या १५ वर्षांच्या इतिहासात तीन वर्ल्ड कार पुरस्कार जिंकणारी ‘आय-पेस’ ही पहिली गाडी ठरली आहे.

न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये २४ देशांतील ८६ मोटरिंग पत्रकारांनी या गाडीची पुरस्कारासाठी निवड केली. अगदी आठवडाभर आधीच या गाडीने ‘युरोपियन कार ऑफ दी इअर’ हा किताबही मिळवला होता. त्यामुळे जगातील सर्वाधिक आवडीची प्रीमिअम इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) म्हणून या गाडीच्या स्थानावर शिक्कामोर्तबच झाले आहे.

‘जग्वार लँड रोव्हर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. राल्फ स्पेथ म्हणाले, ‘वर्ल्ड कार परीक्षकांनी आय-पेसला तीन पुरस्कार देणे हा आमचा सन्मान आहे. शून्य उत्सर्जन, शून्य अपघात, शून्य गर्दी या आमच्या डेस्टिनेशन झिरो दृष्टिकोनाच्या दिशेने आम्ही ही संकल्पना घेऊन सुरुवात केली. हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे ‘आय-पेस’. शिवाय, ‘ईव्ही’ ही मोजक्या लोकांची आवड होती, तेव्हा आम्ही ही संकल्पना आणली.’ 

‘जगातील सर्वोत्कृष्ट प्रीमिअम इलेक्ट्रिक व्हेइकल आणि खऱ्या अर्थाने जग्वार चालकाची कार म्हणून एक नवा मापदंड स्थापित करण्यासाठी आम्ही अगदी शून्यातून सुरुवात केली. ‘आय-पेस’ला ‘२०१९ वर्ल्ड कार ऑफ दी इअर’, ‘वर्ल्ड कार डिझाइन ऑफ दी इअर’ आणि ‘वर्ल्ड ग्रीन कार’ हे पुरस्कार मिळाल्याने आमच्या या पहिल्या ऑल इलेक्ट्रिक गाडीला सुयोग्य असा सन्मान प्राप्त झाला आहे. ही गाडी अतुलनीय व्हावी या निष्ठेने ‘आय-पेस’ची निर्मिती करणाऱ्या टीमचे मी आभार मानतो,’ असे स्पेथ याने सांगितले. 

यूकेमध्ये डिझाइन आणि निर्मिती केली गेलेली ‘आय-पेस’ अनेक नव्या ग्राहकांना ‘जग्वार’कडे आकर्षित करून घेत आहे. यातील अनेकांची ही पहिली ‘ईव्ही’ आहे. आजवर जगभरात ६० देशांमधील ११ हजारांहून अधिक ग्राहकांनी या गाडीची डिलिव्हरी घेतली आहे. स्पोर्टस् कारचा परफॉर्मन्स, शून्य उत्सर्जन, बारकाव्यांमधील अतुलनीय उत्कृष्टता आणि अस्सल एसयूव्ही व्यक्तिमत्त्व या साऱ्याचा मेळ असल्याने ‘आय-पेस’ या प्रकारातील निर्विवाद निवड ठरली आहे.

न्यूयॉर्कमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित असलेले ‘जग्वार’चे डायरेक्टर ऑफ डिझाइन इआन कॅलम म्हणाले, ‘जग्वार कार डिझाइन करणे हे जगातील सर्वोत्कृष्ट काम आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगू शकतो, की मी आजवर केलेल्या इतर कोणत्याही कामातून मला इतके समाधान मिळाले नाही, जे ‘आय-पेस’ने दिले. इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये डिझायनर्सना गाडीतील गुणोत्तर, प्रोफाइल आणि त्याचे पॅकेजिंग या साऱ्याचा नव्याने विचार करण्यासाठी अमर्याद स्वातंत्र्य मिळते आणि माझ्या टीमने या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. हे तिन्ही पुरस्कार मिळणे हा त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे.’

‘आय-पेस’मधील नाट्यमय, कॅब-फॉरवर्ड प्रोफाइल, छोटे ओव्हरहँग्स आणि टाउट, दमदार हाँचेस यामुळे या गाडीला एक नाट्यमय रूप मिळते आणि ती इतर एसयूव्हींपेक्षा वेगळी ठरते. यातील बीस्पोक इलेक्ट्रिक व्हेइकल आर्किटेक्चरच्या साह्याने रचण्यात आलेले प्रशस्त इंटेरिअर प्रीमिअम बारकावे आणि अप्रतिम जग्वार कारागिरीने सजले आहे. आय-पेसमध्ये अत्याधुनिक ९०केडब्ल्यूएच लिथिअम-इऑन बॅटरी आहे आणि यामुळे २९२ माइल्सपर्यंतची (डब्ल्यूएलटीपी सायकल) रेंज मिळते. ही बॅटरी अवघ्या ४० मिनिटांत शून्य ते ८० टक्क्यांपर्यंत (१००केडब्ल्यू डीसी) चार्ज होते, किंवा रात्रभर घरगुती स्वरूपावर घरगुती वॉलबॉक्सवर (सात केडब्ल्यू एसी) चार्ज केल्यास १० तासांमध्ये इतकी चार्ज होते.

स्मार्ट, कमाल रेंज देणाऱ्या या तंत्रज्ञानात बॅटरी प्री-कंडिशनिंग सिस्टमही आहे. ‘आय-पेस’चे चार्जिंग सुरू केल्यानंतर बॅटरीचे तापमान आपोआप वाढते (किंवा कमी होते). त्यामुळे, लगेच गाडी सुरू केल्यास अधिक रेंज मिळते. ‘आय-पेस’ला पंचतारांकित यूरो एनसीएपी सेफ्टी रेटिंगही मिळाले आहे. या गाडीच्या रचनेत प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री बाळगली जाते. शिवाय, रस्त्यावरील इतर गाड्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही या तंत्रज्ञानात विचार करण्यात आला आहे. पादचारी आणि सायकलस्वार लक्षात यावेत यासाठी यात उपयोजक बोनेट आणि आपोआप चालणारे आपत्कालीन ब्रेक्स आहेत.

साधारण वर्षभरापूर्वी गाडीचे अनावरण झाल्यापासून ‘आय-पेस’ने ६२ पुरस्कार जिंकले आहे. यात ‘युरोपियन कार ऑफ दी इअर’, ‘जर्मन, नार्वेजिअन आणि यूके कार ऑफ दी इअर’, ‘बीबीसी टॉप गीअर मॅगझीन ईव्ही ऑफ दी इअर’, ‘चायना ग्रीन कार ऑफ दी इअर’ आणि ‘ऑटोबेस्ट’च्या ‘इकोबेस्ट अॅवॉर्ड’चा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search