Next
‘शाहू महाविद्यालया’तर्फे व्याख्यानाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 04:58 PM
15 0 0
Share this article:

व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. अविनाश देवस्थळी, डॉ. पी. पी. विटकर, प्रा केदार टाकळकर,  प्रा. सुधीर भिलारे   प्राचार्य डॉ. राकेशकुमार जैन

पुणे : बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचा व्यवस्थित अंदाज यावा तसेच त्यांची मानसिक तयारी व्हावी या हेतूने जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘तयारी सीईटी परीक्षेची’ या विषयावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. केदार टाकळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राकेशकुमार जैन, ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ पी. पी. विटकर, संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, संकुल उप संचालक रवी सावंत, उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्रा. टाकळकर म्हणाले, ‘सीईटी आणि आयआयटी परीक्षेची तयारी करताना वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. एमसीक्यूसारखे प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी कधीही अतिआत्मविश्वास बाळगू नये. आपला अभ्यास व्यवस्थित झाला असेल, तर परीक्षेचे दडपण येणार नाही. आपण अभ्यास करण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करावा. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसाठी जास्त उदाहरणे सोडविण्याची तयारी करावी. रोज सर्व विषयांना समान वेळ देऊनच तयारी करावी. रसायनशास्त्र या विषयात रासायनिक अभिक्रिया यांचा जास्त अभ्यास करावा. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सीईटी परीक्षा दिल्यावर लागणारी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित करावी. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालय निवडताना व्यवस्थित काळजी घ्यावी.’

पाहुण्यांचे स्वागत करताना डावीकडून प्रा. अविनाश देवस्थळी,डॉ पी.पी विटकर, प्रा केदार टाकळकर, प्राचार्य डॉ राकेशकुमार जैन,  प्रा सुधीर भिलारे

प्राचार्य डॉ. जैन यांनी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि इतर विषयातील यश, तसेच महाविद्यालयाची माहिती दिली. महाविद्यालयाची वेगळी शैक्षणिक पद्धत विद्यार्थ्यांसाठी कशी उपयोगी पडते, याबाबतही सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. संतोष राव बोर्डे यांनी महाविद्यालयात येणाऱ्या विविध कंपन्या आणि विद्यार्थ्यांना मिळणार्‍या नोकरीच्या संधींविषयी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबरीश क्षीरसागर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. संतोष पाचपुते यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search