Next
‘सायबेज’च्या संचालक मंडळात वॉल्टर मास्टेलिंक
प्रेस रिलीज
Monday, July 09, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this story

वॉल्टर मास्टेलिंकमुंबई : उत्पादन अभियांत्रिकी सेवांना आउटसोर्स करण्यात तज्ज्ञ असलेली आघाडीची जागतिक तंत्रज्ञान सल्लासेवा कंपनी ‘सायबेज’ने (Cybage) उद्योजक वॉल्टर मास्टेलिंक यांना आपल्या संचालक मंडळावर नियुक्त केले आहे. वॉल्टरसारख्या उल्लेखनीय आणि अनुभवी व्यावसायिक धुरीणाची नेमणूक ‘सायबेज’च्या दृष्टीने मोलाची ठरणार आहे. ‘सायबेज’मधील आपल्या भूमिकेमध्ये वॉल्टर कंपनीचा दृष्टीकोन, धोरणात्मक दिशा आणि व्यवसायाच्या ध्येयांची पूर्ती यांना मजबूती प्रदान करतील.

आपल्या २५ वर्षांच्या नेत्रदीपक कारकीर्दीमध्ये व्यासंगी उद्योजक वॉल्टर यांनी अनेक यशस्वी व नफ्यातील उद्योगांची अगदी शून्यातून उभारणी केली आहे. त्यांनी १९९१मध्ये ट्रांसिक्सची स्थापना केली आणि ट्रांसिक्सला बेल्जियमची स्थानिक एंटरप्राइजपासून, तर रस्ते वाहतूक क्षेत्रामधील फ्लीट व्यवस्थापन आणि टेलिमॅटिक्स उपायांची जागतिक अग्रणी कंपनीपर्यंत रूपांतरीत केले.

‘सायबेज’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण नाथानी म्हणाले, ‘यशस्वी कंपन्यांची उभारणी करणे आणि त्यांना बाजारात आघाडीच्या स्थानावर पोहोचविण्याचा वॉल्टर यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आपल्या संचालक मंडळामध्ये व्यवसायाच्या विविध पैलूंची सखोल, प्रत्यक्ष जाण असलेली दिग्गज व्यक्ती असणे सायबेजसाठी एक महत्त्वाची उपलब्धी आहे. वॉल्टरने सोबत आणलेल्या समृद्ध उद्योजकीय अनुभवाने ‘सायबेज’ला क्षेत्रातील आघाडीचे स्थान टिकवण्यासोबतच आपल्या उद्योजकीय मूल्यांचे जतन करण्यास मदत मिळेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link