Next
‘मोबिक्विक’ची ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, April 05, 2018 | 03:14 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : मोबिक्विक या भारताच्या सर्वांत मोठ्या डिजिटल वित्त सेवा मंचाने मायक्रोसॉफ्टच्या चॅट मंचावरील डिजिटल पेमेंट सेवा-मायक्रोसॉफ्ट कैझालाला सशक्त करणार्‍या त्याच्या मायक्रोसॉफ्टसोबतच्या भागीदारीची घोषणा केली.

या सहयोगाद्वारे, मायक्रोसॉफ्ट कैझाला यूजर मायक्रोसॉफ्ट कैझाला मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या बाहेर न पडता मोबिक्विक वॉलेटद्वारे वन टू वन आणि ग्रुप चॅट संभाषणामध्ये त्वरित व्यक्ती ते व्यक्ती (पीटूपी) तसेच व्यक्ती ते व्यापारी (पीटूएम) पेमेंट करू शकतील. या सहयोगामधून ‘मोबिक्विक’ही ‘कैझाला’च्या युजरसाठी डिजिटल पेमेंट सेवा सक्षम करणारे मायक्रोसॉफ्टसाठी पहिले मोबाईल वॉलेट भागीदार बनले आहे.

ग्राहक ते ग्राहक वॉलेट व्यवहार सक्षम करण्याव्यतिरिक्त, ही भागीदारी फक्त ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यास व्यवसायांना सक्षम करत नाही, तर ती मायक्रोसॉफ्ट कैझालावर व्यवसाय ते व्यवसाय व्यवहारांनाही परवानगी देते. लाखो भारतीयांना डिजिटल पेमेंटपर्यंत सहज प्रवेश पुरवणे हे ‘मोबिक्विक’चे ध्येय आहे आणि फर्स्टलाईन वर्कफोर्सला अधिक उत्पादक बनवणे आणि त्यांना वास्तविक वेळेमध्ये संभाषण करण्यास सक्षम बनवणे या मायक्रोसॉफ्ट कैझालाच्या ध्येयाशी प्रत्यक्षपणे संरेखित आहे.

‘कैझाला’वर पेमेंटचे सक्षमीकरण केल्यामुळे जास्तीत जास्त फर्स्टलाईन कामगारांना सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ते पेमेंटसोबत चॅटवर व्यवसायिक कार्यप्रवाह पूर्ण करू शकतील. याशिवाय, हे वैशिष्ट सुरू झाल्यानंतर संघटना आता मायक्रो-पेमेंटचे वितरण करू शकतात, बिल खर्च नुकसानभरपाईला सक्षम करू शकतात आणि त्यांच्या मोबाईल वर्कफोर्सला कुठेही, कधीही प्रवास भत्ता देऊ शकते.

‘मायक्रोसॉफ्ट कैझालामध्ये ज्यापर्यंत पोहचले जाऊ शकतो, असा फार प्रचंड वैविध्यपूर्ण यूजर बेस आहे. या सहयोगासह, आम्ही शासकीय विभागांअश वैविध्यपूर्ण उद्योगांमधील शतको संघटनांदरम्यान युजरसाठी ‘पीटूपी’ आणि ‘पीटूएम’ पेमेंट सक्षम करू शकतो. हे लाखो भारतीयांना डिजिटल पेमेंटना सहज प्रवेशास सक्षम करण्याच्या ‘मोबिक्विक’च्या ध्येयाशी संरेखित आहे’, असे ‘मोबिक्विक’चे संस्थापक आणि सीईओ बिपिन प्रीत सिंह म्हणाले.

‘मर्यादित इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या क्षेत्रांमध्येही ‘कैझाला’ वापरण्यामधील सुकरता, हा सर्वांत मोठा लाभ आहे, ज्याद्वारे आमच्यासाठी मोठे बाजार केंद्रीकरण सक्षम होईल. ‘कैझाला’द्वारे आमचा पहिला मोबाईल वॉलेट प्रदाता म्हणून निवड झाल्याबद्द्ल आम्हाला फार आनंद झाला आहे आणि आम्ही कैझाला युजरना आमच्या सेवा ऑफर करण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहोत. देशामधील सर्व नव्या युजरपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करण्यासाठी हा सहयोग फलदायी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे,’ असे सिंह यांनी नमूद केले.

‘जेव्हा आम्ही भारतासाठी जुलै २०१७मध्ये मायक्रोसॉफ्ट कैझाला सुरू केले, तेव्हा आम्ही ग्राहकांना तसेच व्यवसायांना प्रवासामध्ये असतानाही एकत्र येण्यास आणि उत्पादक बनण्यासाठी सुरक्षित चॅट मंच पुरवला. ‘कैझाला’चा वापर आज उद्योगाच्या विभिन्न विभागांमध्ये हजारो संघटनांद्वारे दैनंदिन कार्यप्रवाहासाठी केला जातो आणि हे वाढतच आहे. काम पूर्ण होण्यासाठी अ‍ॅपमध्ये पेमेंटचे व्यवहार व्हावेत, अशी युजरद्वारे केली जाणारी प्रमुख मागणी होती आणि आम्हाला ‘मोबिक्विक’च्या सहयोगाने हे ऑफर करण्यास आनंद होत आहे,’ असे ‘मायक्रोसॉफ्ट’चे ऑफिस प्रॉडक्ट ग्रुप, कॉर्पोरेट उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले.

त्वरित मेसेंजर, सहयोग पोर्टल आणि उत्पादकता वर्धकाचे एकसंधी केंद्रीकरण पुरवण्यासाठी भारतामध्ये जुलै २०१७मध्ये मायक्रोसॉफ्ट कैझालाला सुरुवात झाली. आरंभिक स्वीकारकर्ता कार्यक्रमाद्वारे विद्यमान ऑफिस ३६५ ग्राहक त्यांच्या युजरसाठी कैझाला प्रोचे १२ महिन्यांचे मोफत सदस्यत्व मिळवू शकतात. यूजर अद्वितीय आयडी म्हणून त्यांच्या फोन क्रमांकाचा वापर करून मायक्रोसॉफ्ट कैझालाचा त्वरित वापर करू शकतात. दूरस्थ ठिकाणांवर कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी हे टू-जी साठी सानुकूलित आहे. मायक्रोसॉफ्ट कैझाला हे यस बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, अपोलो टेलेमेडिसिन, नारायणा हृदयालय, युनायटेड फॉस्फोरस आणि केंद्रीय विद्यालय संगठण सारख्या ९०० संघटनांद्वारे वापरले जाते.
 

‘मोबिक्विक’विषयी :
‘मोबिक्विक’ हे भारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एक प्रमुख मोबाईल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे ३० दशलक्ष थेट व्यापारी आणि २६० दशलक्षपेक्षा अधिक युजरचे विस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन २००९मध्ये कंपनीची स्थापना केली असून, कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडियाटेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट१ आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे.

सन २०१७मध्ये ‘मोबिक्विक’ने ‘बीएसएनएल’, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि इंडसइंड बँक यासारख्या आघाडीच्या ब्लू-चिप ब्रँडसह एक लघु भागीदारी सुरू केली आहे, ज्यामुळे सुरू केल्यापासून जवळपास २६० दशलक्ष भारतीयांनी त्याचा लाभ घेतला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये मध्ये, ‘बीएसएनएल’ने बीस्पोक मोबाईल वॉलेट सुरू करून डिजिटल क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले, जे वॉलेट मोबिक्विकद्वारे विकसित आणि पारीत करण्यात आले आहे.

अलीकडेच, कंपनीने बजाज फिनसर्व्हसह भागीदारी करून भारताचे पहिले क्रेडिट वॉलेट सुरू केले आहे, ज्याद्वारे क्रेडिट आणि लोन प्राप्त करू शकता. बजाज फिनसर्व्ह-मोबिक्विक वॉलेट हे भारताचे पहिले क्रेडिट वॉलेट आहे. यासह ‘मोबिक्विक’ने भारताचे पहिले ऑटो-लोड वॉलेट तयार केले असून ज्याचा लाभ इंडसइंड बँकचे १० दशलक्षपेक्षा अधिक ग्राहक घेऊ शकतात. त्यांना फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे खरेदी करण्यासाठी त्यांना त्यांच्या वॉलेटवर टॅप करायचे आहे आणि त्यांच्या इंडसइंड अकाउंटमधून स्वयंचलितपणे पैसे वजा होतील. तसेच कंपनीने व्हर्च्युअल कार्डसाठी आयडीएफसी बँकसह करार केला आहे. कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link