Next
‘होंडा’ने दाखल केली ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’
प्रेस रिलीज
Friday, July 13, 2018 | 03:40 PM
15 0 0
Share this story

गुरूग्राम : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ‘२०१८ सीडी ११० ड्रीम डीएक्स’ उपलब्ध केल्याची घोषणा केली. पहिल्यांदा मोटरसायकल खरेदी करणाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली नवी ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’ ही सन १९४९मध्ये जपानमध्ये दाखल करण्यात आलेल्या ‘होंडा’च्या पहिल्या मास मोटरसायकल ड्रीम डीची परंपरा जपणारी आहे.  

‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’च्या २०१८ आवृत्तीमध्ये आकर्षक गोल्ड ग्राफिक्स व क्रोम मफलर प्रोटेक्टर आहे. ‘सीडी ११०  ड्रीम डीएक्स’मध्ये हेव्ही ड्युटी रिअर कॅरिअर असून, त्यामुळे या मोटरसायकलची उपयुक्तता व वैविध्य वाढले आहे. लांब सीट व व्हीलबेसमुळे ही मोटरसायकल आरामदायीपणे चालवता येते; तसेच मजबूत व टिकाऊ सस्पेन्शनमुळे ताणमुक्त प्रवास करता येतो.

नव्या आवृत्तीविषयी बोलताना, ‘होंडा मोटरसायकल’चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘वैशिष्ट्यपूर्ण सीडी ब्रँड सन १९६६पासून जगभरातील लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकत आहे. ही परंपरा कायम राखत, ‘२०१८ सीडी ११० ड्रीम डीएक्स’ही तितकाच विश्वास व विश्वासार्हता जपत आहे. नव्या आवृत्तीला आमच्या ग्राहकांकडून व विशेषता ग्रामीण भागाकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.’

२०१४ मध्ये दाखल झाल्यापासून ‘सीडी ११० ड्रीम’ने उपयुक्तता अपेक्षित असलेल्या ग्राहकांच्या जीवनात स्थान निर्माण केले आहे. वाइड हँडल अँगलमुळे वाहतुकीमध्ये ही मोटरसायकल सहज हाताळता येते. ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’तील ट्युबलेस टायर्स, व्हिस्कस एअर फिल्टर व मेंटेनन्स-मुक्त बॅटरीमुळे ही मोटरसायकल कोणत्याही ताणाविना वापरता येते.

‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’ न्यू ब्लॅक व केबिन रेड, ब्लॅक व ग्रीन मेटॅलिक, ब्लॅक व ग्रे सिल्व्हर मेटॅलिक, ब्लॅक व रेड, ब्लॅक व ब्ल्यू मेटॅलिक या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, तिची किंमत ४८ हजार २७२ (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांपासून आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link