Next
अजरामर ‘गीत रामायण’
BOI
Tuesday, March 20, 2018 | 11:46 AM
15 0 0
Share this article:

‘मोडू नका वचनास-गाथा मोडू नका वचनास, भरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास’ या गदिमांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द गायिका कुमुदिनी पेडणेकर यांनी गायिले आहे. ग. दि. माडगूळकर यांचे शब्द, सुधीर फडक्यांची संगीतरचना आणि सीताकांत लाड यांचे संयोजन यातून साकारलेल्या गीत रामायणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले.

माडगूळकर यांचा रसास्वाद आणि त्या दिग्गजांच्या आठवणींचा सश्रद्ध मधुकोष म्हणजेच अरुण गोडबोले यांचे हे पुस्तक. पुस्तकात गीत, राग, गायक अथवा गायिका यांची नावे, त्या गीताचा रसास्वाद आणि गीताच्या अनुषंगाने एखादी आठवण दिली आहे.

मर्यादापुरुषोत्तम राम, एकपत्नी, एकवचनी राम, आज्ञाधारक पुत्र राम अशी श्रीरामाची विविध रूपे या गीतांमध्ये दिसतात. आनंद देतात, प्रेरणा देतात.  

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २५६
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search