Next
‘जेट एअरवेज’च्या फेअर चॉइसेस योजनेमध्ये सुधारणा
प्रेस रिलीज
Thursday, September 20, 2018 | 01:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : विमान सेवेचे भाडे किती असावे, हे ठरविण्याचे पर्याय प्रवाशांना फेअर चॉइसेस या योजनेअंतर्गत देऊन दोन वर्षे उलटल्यानंतर जेट एअरवेजने आता या योजनेमध्ये काही सुधारणा केल्या आहेत.

प्रवास भाड्याचे पर्याय (फेअर चॉईसेस) या नावात नमूद केल्याप्रमाणे जेट एअरवेजने आपल्या प्रवाशांना त्यांच्या पसंतीचे प्रवासभाडे व त्या अनुषंगाने प्रवासाचा अनुभव, इतर सेवा यांची निवड करता येते. नव्या सुधारणांनुसार, या योजनेमध्ये प्रवाशांना त्यांच्या पैशाचे जास्त मोल मिळते, तसेच त्यांचे प्राधान्य, गरजा आणि आर्थिक स्थिती यांनुसार प्रवासाचे स्वरूप ठरविता येते.

सध्या जेट एअरवेजच्या इकॉनॉमी या श्रेणीमध्ये लाइट, डील, सेव्हर, क्लासिक आणि फ्लेक्स असे पाच तिकिटांचे पर्याय देण्यात आले आहेत. यातील लाइट आणि डील या दोन तिकीटांचे देशांतर्गत विमानसेवेचे इकॉनॉमी श्रेणीचे तपशील जेट एअरवेजने आता जाहीर केले आहेत. प्रवाशांना अगदी कमी पैशांमध्ये प्रवास करायचा असतो व त्यांना प्रवासात जेवण घ्यायचे किंवा कसे याचा पर्याय हवा असतो, असे निष्कर्ष सर्वेक्षणांमध्ये आढळून आले आहेत.

२८ सप्टेंबर २०१८पासून इकॉनॉमी श्रेणीतून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व लाइट अथवा डील या योजनांची तिकीटे घेणाऱ्यांना स्पर्धात्मक दरांतील भाडे आकारण्यात येईल. तसेच विमानात निवडक, उत्तम दर्जाचे भोजनही विकत घेता येईल. काही विशिष्ट उड्डाणांमध्ये शाकाहारी, मांसाहारी या दोन्ही पद्धतीचे गरम अन्नपदार्थ त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवासी या भोजनाचे पैसे त्यांच्या डेबिट वा क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून देऊ शकतील. या प्रवाशांना चहा, कॉफी आदी पेये पूर्वीप्रमाणेच मोफत पुरविण्यात येतील. हे बदल २५ सप्टेंबरपासून अंमलात येतील.

२४ सप्टेंबरपूर्वी लाइट वा डील या योजनांची तिकीटे खरेदी करणाऱ्यांना पूर्वी ठरल्याप्रमाणेच भोजन व पेये ही मोफतच पुरविण्यात येणार आहेत. सेव्हर, क्लासिक, फ्लेक्स आणि इतर सर्व योजनांमध्ये देशांतर्गत इकॉनॉमी श्रेणीतील प्रवासासाठी भोजन मोफतच असेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये पहिली श्रेणी, प्रीमिअर आणि इकॉनॉमी यांतील सोयी-सुविधांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जेट प्रीव्हिलेजच्या सर्व सदस्यांना सर्व फेअर चॉइस योजनांमध्ये जेपी माइल्स हे गुण सर्व फ्लाइट्सवर मिळतील; तसेच हे सदस्य त्यांच्या गुणांचा मोबदला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्येही मिळवू शकतील. जेट एअरवेजच्या सहयोगी कंपन्या त्यांच्या जगभरातील एक हजार ठिकाणच्या फ्लाइट्समध्येही हा मोबदला या सदस्यांना देऊ करतील.

जेट एअरवेजकडील बोइंग ७३७ विमानांमध्ये असलेल्या अत्याधुनिक, मोफत वायरलेस यंत्रणेमधून मनोरंजनाचा आनंद देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहे; तसेच जेटचे खास भारतीय शैलीचे आदरातिथ्य कायम राहणारच आहे.

या नव्या घडामोडींविषयी जेट एअरवेजचे जागतिक विक्री व वितरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार म्हणाले, ‘जगभरातील सर्व एअरलाइन्समध्ये प्रवाशांच्या, विशेषतः तरुणांच्या गरजा व आवडीनिवडी यानुसार सतत धोरणे बदलत असतात. या प्रवाशांना नाविन्यतेची ओढ असते व आपल्याला हवी तशी सेवा मिळवण्याचा त्यांचा हक्कही असतो. भारतातील उच्च श्रेणीतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी कंपनी या नात्याने त्यांच्या गरजांना अनुरूप अशी सेवा देणे व त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणे हे आमचे कर्तव्यच ठरते. २०१६मध्ये आम्ही फेअर चॉइसेस ही योजना त्या हेतूनेच मांडली होती. आताची या योजनेतील सुधारणा हेही याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. या प्रवाशांना अधिक पर्याय आणि सुविधा देण्याचा यामागे उद्देश आहे. या सुधारणा आमच्या प्रवाशांना पसंत पडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.’

जेट एअरवेजचे मार्केटिंग, इ-कॉमर्स आणि इनोव्हेशन्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेल्सन कुटिनो म्हणाले, ‘ग्राहकांच्या गरजा केवळ वाढत जात आहेत, असे नव्हे, तर ग्राहकांना स्वतःला निर्णय घेण्याची संधी हवी असते; तसेच अनेक पर्यायही हवे असतात. जागतिक स्तरावरील एअरलाइन असल्याने ग्राहकांच्या या आवडी-निवडींची दखल घेऊन, त्यांच्या प्रतिसादांना उत्तरे देऊन आम्ही त्यांना नाविन्यपूर्ण सेवा देण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. आताच्या आमच्या सुधारणा याही ग्राहकांच्या अपेक्षांनुसारच करण्यात आल्या आहेत. त्यातून त्यांच्या प्रवासाच्या गरजा भागल्या जातील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search