Next
आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 03:08 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘पुणे शहर विभाग क्रीडा समिती’द्वारा आयोजित ‘वरिष्ठ गट आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धे’मध्ये ‘एमसीई सोसायटी महाविद्यालया’ने विजेतेपद पटकाविले. 

‘महाराष्ट्र कॉस्मोपोलोटिन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, ‘आझम स्पोर्टस् अॅ,कॅडमी’चे संचालक गुलजार शेख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
 
अलीकडेच झालेल्या अंतिम सामन्यात एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने एमएमसीसी महाविद्यालयाचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एमएमसीसी महाविद्यालयाने ४० षटकात नऊ गडी बाद २२३ धावा केल्या. त्यामध्ये पारस गवळी व विनय पाटील यांनी प्रत्येकी ६८ धावा केल्या. त्यांना अभिमन्यू याने ४१ धावा करून साथ दिली. दानिश पटेल याने चार गडी बाद केले. त्यास प्रतिउत्तर देताना, एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने ३९.५ षटकांमध्ये सहा गडी गमावून २२४ धावा करून विजय मिळवला. विजयी संघाकडून झैद पटेल याने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर झैद अन्सारी याने ४२ आणि दानिश पटेल याने ४० धावा केल्या. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link