Next
‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे धाडसी सुरक्षारक्षकाचा सत्कार
प्रेस रिलीज
Thursday, November 02 | 06:12 PM
15 0 0
Share this story

श्री. राणूसिंह यांचा बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पणजी  : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न उधळून लावणारे धाडसी सुरक्षा कर्मचारी श्री. राणूसिंह यांचा बॅंकेतर्फे सत्कार करण्यात आला. बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांच्या हस्ते श्री. राणूसिंह यांना रोख २१ हजार रुपये आणि सन्मानपत्र बँकेच्या पणजी कार्यालयामध्ये बहाल करण्यात आले. या वेळी गोवा परिमंडळाच्या व्यवस्थापक चित्रा दातार आणि पणजी शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रणबजीत सिंग सरकार उपस्थित होते.

दरोडेखोरांनी २७ ऑक्टोंबरच्या रात्री येथील एम.जी. रोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कर्तव्यावर असणारे सुरक्षा कर्मचारी श्री. राणूसिंह यांनी दरोडेखोराच्या हातातील हातोड्यांचे प्रहार सहन करत त्यांना ठामपणे प्रतिकार केला आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न उधळून लावला.  

‘श्री. राणूसिंह यांनी दाखवलेले धाडस अतुलनीय आहे. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून दरोडेखोरांचा प्रतिकार केला. त्यांच्या या धाडसाची सर्वांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली पाहिजे’ असे उदगार बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, ‘जनतेच्या पैशांवर पडणारा दरोडा स्वत:चा जीव जोखमीत घालून परतवून लावणे ही राणूसिंह यांच्या कर्तव्याबाबतची निष्ठा सिद्ध करते. त्यामुळेच त्यांची  कृती ही सर्वांसाठीच प्रेरणादायी तसेच अनुकरणीय आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link