Next
रत्नागिरीत मिसळ महोत्सवाचे आयोजन
राजरत्न प्रतिष्ठानचा पुढाकार
BOI
Monday, March 18, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील राजरत्न प्रतिष्ठानतर्फे २२ ते २६ मार्च २०१९ या कालावधीत रत्नागिरीत मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आवाज उठविणाऱ्या आणि गरजूंच्या मदतीसाठी कधीही तत्पर असणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठानमार्फत शहरात गेल्या वर्षी प्रथमच मिसळ महोत्सव भरविण्यात आला होता. या महोत्सवाला खवैय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवात मिसळीचे अनेक प्रकारही पाहायला मिळाले होते. गतवर्षी भरविलेल्या या महोत्सवात सुमारे दहा हजार जणांनी भेट देऊन विविध प्रकारच्या मिसळींचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर लोकाग्रहास्तव अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर खाद्य महोत्सव भरविण्यात आला होता. त्यालाही रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद दिला.

या वर्षीही प्रतिष्ठानतर्फे मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २२ ते २६ मार्च या कालावधीत शहरातील माळनाका येथील नगर पालिकेच्या व्यायामशाळेसमोरील मैदानात भरविण्यात येणार आहे. या वर्षी महोत्सवासाठी आतापर्यंत मिसळींच्या २० हून अधिक स्टॉल्सची नोंदणी करण्यात आली असून, अजूनही स्टॉल्सच्या नोंदणीसाठी ओघ कायम आहे. स्टॉल्स आणि महोत्सवादरम्यान खवैय्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन या वर्षी अपुऱ्या जागेमुळे मर्यादित स्टॉल्स मांडण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या वर्षीही महोत्सवात मिसळींचे विविध प्रकार चाखायला मिळणार असून, या महोत्सवातून संकलित होणाऱ्या निधीचा उपयोग सामाजिक कामांसाठी केला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सभासद परिश्रम घेत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
vijay b desai About 100 Days ago
sundar upkram
0
0

Select Language
Share Link
 
Search