Next
‘कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग निश्चितपणे पूर्णत्वाला नेऊ’
केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही
BOI
Wednesday, February 06, 2019 | 02:19 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक, डॉ. प्रतापसिंह जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

कोल्हापूर : ‘पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गास केंद्राने मान्यता दिली असून, हे काम निश्चितपणे पूर्णत्वाला नेऊ,’ अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर येथे दिली. मध्य रेल्वेच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे उभारलेल्या नवीन विश्राम कक्षाचे आणि राजारामपूरीच्या दिशेने दुसऱ्या प्रवेशमार्गासह सर्व फलाटांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

या समारंभास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महापौर सरिता मोरे, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर आदी मान्यवर उपस्थित होते.


‘कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यात व्यापारवृद्धी वाढेल; तसेच शेती उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध होतील, निर्यातीला चालना मिळेल,’ असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. ‘कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गाबरोबरच कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग निश्चितपणे पूर्णत्वाकडे नेऊ;तसेच पश्चिम महाराष्ट्र हा एक देशातील सर्वांगीण विकसित झालेला भाग असेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘सामान्य माणसाच्या हितासाठी रेल्वेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्र शासनाने प्रधान्य दिले आहे. चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासनाने रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामधील योजना आता प्रत्यक्षात पूर्ण होऊ लागल्या आहेत. देशात रेल्वेमार्गांच्या नुतनीकरणाचे मोठे काम झाल्याने अपघाताचे प्रमाण शुन्यावर आले आहे. यापुढेही रेल्वे अधिक लोकाभिमुख बनविली जाईल,’ असेही सुरेश प्रभू  म्हणाले.

रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, प्रवासी आणि नागरिक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 116 Days ago
Map of the route? Proposed date of completion ? Has the work started ?
0
0

Select Language
Share Link
 
Search