Next
स्वरसम्राज्ञी लता
BOI
Wednesday, January 02, 2019 | 10:03 AM
15 0 0
Share this article:

गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी आदी विशेषणांनी गौरविलेल्या व भारतरत्न सन्मानप्राप्त लता मंगेशकर म्हणजे भारतीय चित्रपटांच्या सुवर्णकाळातील सोनेरी पान आहेत. १९५० ते १९७० या काळातील सर्व संगीतकारांची पहिली पसंती लता मंगेशकर असे. अलौकिक प्रतिभेच्या या गायिकेच्या शास्त्रीय, निमशास्त्रीय, सोलो आणि द्वंद्वगीतांचा नजराणा रत्नाकर फडके यांनी ‘स्वरसम्राज्ञी लता’मधून पेश केला आहे.

गुलाम हैदर, मदन मोहन, वसंत देसाई, रोशन, सी. रामचंद्र सचिनदेव बर्मन, नौशाद, खेमचंद प्रकाश, राहुल देव बर्मन, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, अनिल विश्वास आदी संगीतकारांची लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक गाण्यांचे रसग्रहण, गाण्यांची सौंदर्यस्थळे, संगीतकारांचा परिचय व खास आठवणी यातील प्रत्येक प्रकरणांमधून दिल्या आहेत.

‘ए मलिक तेरे बंदे हम’, ‘याद रखना चाँद, तारों, इस सुहानी रात को’, ‘मोहे भूल गये सावरियाँ’, ‘आयेगा आयेगा आनेवाला’, ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए’ अशी अनेक सुरेल गीते व द्वंद्वगीतांच्या या स्वरयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक गाण्यातील आधाररागांची नोंद यात दिली आहे.          

पुस्तक : स्वरसम्राज्ञी लता
लेखक : रत्नाकर फडके
प्रकाशक : संकेत प्रकाशन
पाने : १५९
किंमत : २७५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search